अमित पंघालचा ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 09:26 IST2024-04-14T09:25:38+5:302024-04-14T09:26:12+5:30

भारताच्या एकाही पुरुष बॉक्सरने अद्याप ऑलिम्पिकची पात्रता गाठलेली नाही.

Amit Panghal's inclusion for Olympic qualifiers | अमित पंघालचा ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी समावेश

अमित पंघालचा ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी समावेश

नवी दिल्ली: विश्व चॅम्पियनशिपचा रौप्यविजेता मुष्टियोद्धा अमित पंघालला बँकॉकमध्ये २५ मे ते २ जून या कालावधीत होणाऱ्या अखेरच्या ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. तो ५१ किलो गटात लढत देईल. मागच्या महिन्यात इटलीत झालेल्या पात्रता फेरीत खराब कामगिरी करणाऱ्या पाच खेळाडूंना मात्र यावेळी डच्चू देण्यात आला.

भारताच्या एकाही पुरुष बॉक्सरने अद्याप ऑलिम्पिकची पात्रता गाठलेली नाही.  भारतीय पुरुष  संघ : अमित पंघाल (५१ किलो), सचिन सिवाच ज्युनिअर (५७ किलो), अविनाश जामवाल (५३.५ किलो), निशांत देव (७१ किलो), अभिमन्यू लाऊरा (८० किलो), संजीत (९२ किलो) आणि नरेंदर बरवाल (९२ वरील गट).  महिला : अंकुशिता बोरो (६० किलो), अरुंधती चौधरी (६६ किलो).

Web Title: Amit Panghal's inclusion for Olympic qualifiers