शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

अमरहिंदची अंतिम फेरीत धडक

By admin | Updated: October 31, 2016 04:13 IST

गोल्फादेवी प्रतिष्ठान संघाचा ५२-५० असा चुरशीचा पराभव करुन मुंबई शहर जिल्हा अजिंक्यपद किशोरी गट कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

मुंबई : मध्यांतरानंतर आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत दादरच्या अमर हिंद मंडळ संघाने गोल्फादेवी प्रतिष्ठान संघाचा ५२-५० असा चुरशीचा पराभव करुन मुंबई शहर जिल्हा अजिंक्यपद किशोरी गट कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अन्य सामन्यात शिवशक्ती महिला संघाने ओम कबड्डी संघावर ४२-२९ अशी मात करत अंतिम फेरी गाठली.मुंबई शहर कबड्डी संघटनेच्या वतीने वडाळा येथील भारतीय क्रीडा मंडळाच्या मैदानात सुरु असलेल्या या स्पर्धेच्याउपांत्य फेरीत गोल्फादेवी संघाच्या साक्षी जंगम आणि अस्मिता जंगम यांनी शानदार खेळ करत मध्यांतराला २७-२० अशी आघाडी घेतली. विश्रांतीनंतर मात्र, अमरहिंदच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ केला. अमरहिंदच्या साक्षी माचीवले आणि वेल्सिका नाडार यांनी तुफानी खेळ करत गोल्फादेवी संघाला कडवी झुंज दिली. मध्यांतरांनतर झालेल्या लक्षवेधी खेळात अमरहिंदने ५२-२० अशा अवघ्या दोन गुणांनी थरारक बाजी मारली. अन्य सामन्यात शिवशक्ती महिला संघाने ओम कबड्डी संघावर ४२-२९ असा सहज विजय मिळवला. अक्षता पाटील आणि ज्योती डफळे यांच्या निर्णायक खेळाच्या जोरावर शिवशक्ती संघाने अंतिम फेरी गाठली. ओम संघाच्या योगिता सकपाळ व प्रीती होदे यांनी अपयशी झुंज दिली.द्वितीय श्रेणी व्यावसायिक पुरुष गटात मध्य रेल्वे-माटुंगा, मुंबई अग्निशमन दल, सचिवालय जिमखाना, माझगाव डॉक आदी संघांनी विजयी कूच केली. मध्य रेल्वे विरुद्ध सिद्धिविनायक मंदिर न्यास कबड्डी सामन्यात सिद्धिविनायक संघाने मध्यांतराला १८-१० अशी आघाडी घेतली. मात्र मध्यांतरानंतर रेल्वेच्या सुरज दुधाणे व भुषण राऊत यांनी आक्रमक खेळ करत सिद्धिविनायक संघावर २७-२५ अशी मात केली. मुंबई अग्निशमन दलाने आयुर्विमा महामंडळाला २१-९ आणि माझगाव डॉक कबड्डी संघाने ओरिएन्टल इन्शुरन्स संघाला ३९-२९ असे नमवले. (क्रीडा प्रतिनिधी)