अमलाने खेळपट्टीवर तळ ठोकण्यास शिकविले : बावूमा

By Admin | Updated: December 6, 2015 23:34 IST2015-12-06T23:34:40+5:302015-12-06T23:34:40+5:30

कर्णधार हाशीम अमलाने खेळपट्टीवर तळ ठोकण्याचा धडा दिला, अशी प्रतिक्रिया दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर तेंबा बावूमा याने व्यक्त केली

Amal taught to pitch on the pitch: | अमलाने खेळपट्टीवर तळ ठोकण्यास शिकविले : बावूमा

अमलाने खेळपट्टीवर तळ ठोकण्यास शिकविले : बावूमा

नवी दिल्ली : कर्णधार हाशीम अमलाने खेळपट्टीवर तळ ठोकण्याचा धडा दिला, अशी प्रतिक्रिया दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर तेंबा बावूमा याने व्यक्त केली. अमलाच्या कामगिरीमुळे भारतीय फिरकीपटूंनी निर्माण केलेले दडपण काही अंशी कमी करण्यात आम्हाला यश आले, असेही बावूमा म्हणाला.
बावूमाने सांगितले की,‘भारतीय फिरकीपटूंनी निर्माण केलेले दडपण पेलण्यात आम्ही यशस्वी ठरलो. अन्य तीन कसोटी सामन्यांसाठी असलेल्या खेळपट्टीच्या तुलनेत येथील खेळपट्टी चांगली आहे. मी अन्य तीन सामन्यांमध्ये खेळलो नाही, पण मैदानाबाहेर बसूनही खेळपट्टीची कल्पना आली. सोमवारी दिवसभर आम्ही फलदांजी करण्यात यशस्वी ठरू, अशी आशा आहे.
अन्य फलंदाजांनीही अमला व डिव्हिलियर्स यांचा कित्ता गिरवावा, असे बावूमा म्हणाला. पाचव्या दिवशी खेळपट्टी खराब होण्याची शक्यता आहे, पण आमच्याकडे अनुभवी खेळाडू आहेत. अमला व डिव्हिलियर्स खेळपट्टीवर असून फॅफ ड्यू प्लेसिस व डेन विलास यांच्याकडून चांगल्या कामगिरीची आशा आहे, असेही बावूमा म्हणाला. (वृत्तसंस्था)

Web Title: Amal taught to pitch on the pitch: