शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पदक हुकले असले, तरी मुलीचा गर्व वाटतो - शिवाजी बाबर

By admin | Updated: August 17, 2016 04:00 IST

ललिता पदकापासून वंचित राहिली याची खंत आहेच; पण ज्या परिस्थितीतून तिने आॅलिम्पिकपर्यंत झेप घेतली त्याबबत आम्हाला तिचा गर्व वाटतो

पुणे : ‘‘ललिता पदकापासून वंचित राहिली याची खंत आहेच; पण ज्या परिस्थितीतून तिने आॅलिम्पिकपर्यंत झेप घेतली त्याबबत आम्हाला तिचा गर्व वाटतो,’’ अशा शब्दांत रिओ आॅलिम्पिकमध्ये स्टीपलपेस शर्यतीतील भारताची धावपटू ललिता बाबर हिचे तिच्या आई-वडिलांनी कौतुक केले.ललिताचे वडिल शिवाजी बाबर यांनी सांगितले, की ललिता भारतासाठी आॅलिम्पिक खेळली, याचा आम्हाला गर्व आहे. तिने अंतिम फेरीपर्यंत धडक मारून देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली. तिने ज्या प्रतिकूल परिस्थितीशी लढा दिला त्याबाबत आम्ही दु:खी आहोत. मात्र तरीही तिला जिंकण्याचा विश्वास होता. तसेच, ती पदक जिंकू शकली नसली, तरीही यापुढे आपले सर्वोत्तम प्रदर्शन करीत राहील, असा विश्वासही या वेळी शिवाजी बाबर यांनी व्यक्त केला. साताऱ्याच्या माण तालुक्याची असलेली ललिता ‘माणदेशी एक्स्प्रेस’ नावाने ओळखली जाते. तिचे वडील ट्रकचालक असून आर्थिकदृष्ट्या त्यांची परिस्थिती कमजोर आहे. शिवाजी बाबर यांनी सांगितले, की येथील शैक्षणिक असुविधा आणि पर्वतीय विभाग असल्याने ललिताने अनेक समस्यांना तोंड दिले आहे. ती गावातील शाळेमध्ये अभ्यास करीत असे. त्याचप्रमाणे ललिताच्या गावातील शालेय शिक्षक मुगुट पटोले यांनी सांगितले, की ललिताला खो-खो खेळाची आवड आहे; मात्र नंतर तिने लांब पल्ल्याची धावपटू म्हणून नाव कमावले. ती शेतात आई-वडिलांना मदत करायची आणि शाळेत पोहोचण्यास उशीर होऊ नये म्हणून धावत जायची. यामुळेच ती उत्कृष्ट धावपटू बनली. (वृत्तसंस्था)