महाराष्ट्राच्या अक्षयची विजयी सलामी

By Admin | Updated: January 10, 2015 01:18 IST2015-01-10T01:18:49+5:302015-01-10T01:18:49+5:30

महाराष्ट्राचा बॉक्सर अक्षय मानकर याने ५६ किलो बँटन वेट गटात गुजरातच्या विजयवर दिमाखदार विजयाची नोंद केली

Akshay's victory in Maharashtra | महाराष्ट्राच्या अक्षयची विजयी सलामी

महाराष्ट्राच्या अक्षयची विजयी सलामी

नागपूर : महाराष्ट्राचा बॉक्सर अक्षय मानकर याने ५६ किलो बँटन वेट गटात गुजरातच्या विजयवर दिमाखदार विजयाची नोंद करीत येथील विभागीय क्रीडा संकुलात सुरू असलेल्या बॉक्सिंग इंडियाच्या एलिट बॉक्सिंग स्पर्धेत शुक्रवारी आगेकूच केली.
महाराष्ट्राचा दुसरा बॉक्सर शिवाजी मोरे हा मात्र याच गटात ४६ किलो लाईट फ्लाय गटात मेघालयचा धनबहादूर याच्याकडून पराभूत झाला. दुसऱ्या दिवशी रेल्वे स्पोर्टस् प्रमोशन बोर्डाच्या बॉक्सर्सनी वर्चस्व गाजविले. ५२ किलो फ्लाय गटात रेल्वेचा आमनदीपसिंग याने सेनादलाचा संदीप याला नमविले. रेल्वेचा आणखी एक बॉक्सर सलमान याने बिहारच्या सिकंदरवर शानदार विजयाची नोंद केली.
रेल्वेचा विकास मलिक याला मात्र सेनादलाचा मनजित कुमार याच्याकडून ६० किलो लाईट वेटमध्ये पराभवाचा धक्का बसला.
एलिट बॉक्सिंग :
निकाल : लाईट फ्लाय वेट ४६ ते ४९ किलो: नवीन ओडीआय वि.वि. नितीन केरळ,धनबहादूर मेघालय मात शिवाजी मोरे महाराष्ट्र, विवेकप त्रिपूरा वि.वि. विवेक दास झारखंड, सलमार आरएससीबी वि.वि. सिकंदर बिहार, फ्लाय वेट ५२ किलो : अमनदीप आरएससीबी वि.वि. संदीप एसएससीबी, अशिराज दिल्ली वि. वि. अनिलसिंग कुशवाना दादर नगर हवेली, कविंदरसिंग उत्तराखंड वि.वि. विशाल हिमाचल प्रदेश, मनिष साहू छत्तीसगड वि.वि. मंथन कुमार पाँडिचेरी, बँटम वेट
५६ किलो : अक्षय मानकर महाराष्ट्र वि.वि. विजय गुजरात, पलकित महिंद्रा दिव दमन वि.वि. अनंत पाँडिचेरी, सुनील हरियाणा वि.वि. अभयसिंग त्रिपूरा, अशिनी शर्मा वि.वि. सुनील बिहार,
लाईट वेट ६० किलो : मंजीत कुमार एसएससीबी वि.वि. विकास मलिक आरएससीबी, मोहम्मद इरफान पश्चिम बंगाल वि.वि. संजीब दास आसाम, दिलदार दिव दमन वि.वि. शुभम छत्तीसगड. (क्रीडा प्रतिनिधी)

 

Web Title: Akshay's victory in Maharashtra