शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
7
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
8
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
11
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
12
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
13
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
14
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
15
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
16
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
17
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

अजय उप-उपांत्यपूर्व फेरीत

By admin | Updated: October 14, 2016 01:00 IST

भारताचा अव्वल मानांकित अजय जयराम आणि ११वा मानांकित पारुपल्ली कश्यप यांनी आपल्या लौकिकानुसार विजयी आगेकूच करताना डच ओपन

अल्मेर (हॉलंड) : भारताचा अव्वल मानांकित अजय जयराम आणि ११वा मानांकित पारुपल्ली कश्यप यांनी आपल्या लौकिकानुसार विजयी आगेकूच करताना डच ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जयरामने बल्गेरियाच्या फिलिप शिशोवला, तर कश्यपने डेन्मार्कच्या रेसमस जैमकेला धक्का देत आगेकूच केली.कारकिर्दीमध्ये तब्बल तीन वेळा डच ओपनचे जेतेपद पटकावलेल्या जयरामने एकतर्फी झालेल्या सामन्यात वर्चस्व राखताना फिलिपविरुद्ध २१-७, २१-९ अशी जबरदस्त बाजी मारली. सामन्यात प्रतिकाराची कोणतीही संधी न देताना जयरामने फिलिपचे सहजपणे आव्हान संपुष्टात आणले. त्याचवेळी, तीन गेमपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना पी. कश्यपने डेन्मार्कच्या जैमके याचे कडवे आव्हान २१-११, ७-२१, २१-१० असे परतावले. उपांत्यपूर्व फेरीत जागा निश्चित करण्यासाठी जयरामपुढे नॉर्वेच्या मॅरियस माइरी याचे, तर कश्यपपुढे सहाव्या मानांकित एस्तोनियाच्या रॉल मस्टचे कडवे आव्हान असेल.