मुंबईला हवा विजय

By Admin | Updated: May 13, 2016 03:28 IST2016-05-13T03:28:50+5:302016-05-13T03:28:50+5:30

आधीचा सामना ८५ धावांनी गमविल्यानंतर काल रॉयल चॅलेंजर्स बँगलोरवर विजय मिळविताच रुळावर आलेल्या मुंबई इंडियन्सला आज किंग्ज पंजाब इलेव्हनविरुद्ध पुन्हा एकदा विजय हवा आहे.

Air conquest of Mumbai | मुंबईला हवा विजय

मुंबईला हवा विजय

विशाखापट्टणम : आधीचा सामना ८५ धावांनी गमविल्यानंतर काल रॉयल चॅलेंजर्स बँगलोरवर विजय मिळविताच रुळावर आलेल्या मुंबई इंडियन्सला आज किंग्ज पंजाब इलेव्हनविरुद्ध पुन्हा एकदा विजय हवा आहे.
स्टार फलंदाज रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबईने आयपीएल-९ मध्ये ११ सामन्यांत ६ विजय नोंदविले. पाच सामने गमविल्याने हा संघ १२ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. आठ संघांच्या चढाओढीत तळाच्या स्थानावर असलेला किंग्ज इलेव्हन आधीच प्ले आॅफ बाहेर झाला आहे.
अजिंक्य रहाणे, किरॉन पोलार्ड आणि जोस बटलर यांनी वेळोवेळी चांगली खेळी केली. गोलंदाजीत मिशेल मॅक्लेनगन आणि टिम साऊदी यांनी भेदक मारा केला. फिरकीत हरभजनसिंग अनुभवी असून पोलार्ड, जसप्रीत बुमराह तसेच हार्दिक पंड्या हे पर्यायी गोलंदाजदेखील आहेत.
पंजाबबाबत बोलायचे तर हा संघ मागच्या सामन्यात बँगलोरकडून एका धावेने पराभूत झाला. स्पर्धेच्या मध्येच कर्णधारपदाची धुरा सांभाळणारा मुरली विजयचा अपवाद वगळता एकही फलंदाज स्थिरावू शकला नव्हता. विजयने ५७ चेंडूंत ८९ धावांची खेळी केली; पण त्याची झुंज अपयशीच ठरली होती. डेव्हिड मिलर आणि ग्लेन मॅक्सवेलचा खराब फॉर्म संघाच्या चिंतेचा विषय आहे. गोलंदाजीत संदीप शर्मा, मोहित शर्मा, अक्षर पटेल आणि मार्कस् स्टोइनिस यांच्यावर विजय मिळवून देण्याची जबाबदारी असेल.
> मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), किरॉन पोलार्ड, हरभजनसिंग, कोरी अँडरसन, अंबाती रायुडू, जोस बटलर, आर. विजयकुमार, टीम साउदी, पार्थिव पटेल, जसप्रीत बुमराह, उन्मुक्त चंद, मर्चंट डी लाँग, मिशेल मॅक्लेनघन, अक्षय वाखारे, नितीश राणा, हार्दिक पंड्या, जगदीश सुचित, सिद्धेश लाड, श्रेयस गोपाळ, किशोर कामथ, दीपक पुनिया, कृणाल पंड्या, मार्टिन गुप्टिल व जितेश शर्मा.
किंग्ज इलेव्हन पंजाब : डेव्हिड मिलर (कर्णधार), कायल अ‍ॅबोट, मोहित शर्मा, मिचेल जॉन्सन, ग्लेन मॅक्सवेल, मनन व्होरा, मुरली विजय, ऋषी धवन, शॉन मार्श, वृद्धिमान साहा, गुरकीरतसिंग मान, संदीप शर्मा, अक्षर पटेल, मार्क्स स्टोइनिस, अनुरितसिंग, शार्दूल ठाकूर, फरहान बेहार्डीन, के. सी. करिअप्पा, अरमान जाफर, प्रदीप साहू, स्वप्निल सिंग.

Web Title: Air conquest of Mumbai