शहरं
Join us  
Trending Stories
1
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
2
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
3
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
4
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
5
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
6
कार वापरताय? मग तुमच्या गरजेनुसार निवडा ‘हे’ विशेष ॲड-ऑन्स, वेळीच करा पैशांची बचत!
7
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
8
तामिळनाडूत सत्तेचं गणित जुळेना, विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाला विलंब, चाहत्यानं स्वत: पेटवून घेतलं!
9
नवीन फोन घेतलाय? मग 'या' ५ सेटिंग्ज लगेच करा; एका चुकीमुळे होऊ शकतं मोठं नुकसान!
10
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
11
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
12
'राजा शिवाजी'ने आतापर्यंत कमावले 'इतके' कोटी, दुसऱ्या शुक्रवारचे आकडे समोर
13
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
14
गळाभेट घेतली, नमस्कार केला, पंतप्रधान मोदी भर मंचावर कुणासमोर झाले नतमस्तक, ती ज्येष्ठ व्यक्ती कोण?
15
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
16
Budget Travel: खिशात ५० हजार अन् परदेश वारी! 'या' ७ देशांमध्ये भारतीय रुपया आहे लय भारी
17
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
18
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
19
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
20
Astro Tips: देवापर्यंत प्रार्थना पोहोचली हे कसे ओळखावे? पूजेदरम्यान मिळणाऱ्या 'या' ५ खुणांचा नेमका अर्थ
Daily Top 2Weekly Top 5

सीएम चषक क्रीडा स्पर्धांतही जाहिरातबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 04:16 IST

क्रीडा आणि शिक्षण विभागाला वेठीस धरून भारतीय जनता पक्षाने सीएम चषक क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने निवडणुकीचे बिगुल वाजविण्याचा घाट घातला आहे.

- शिवाजी गोरे 
पुणे : क्रीडा आणि शिक्षण विभागाला वेठीस धरून भारतीय जनता पक्षाने सीएम चषक क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने निवडणुकीचे बिगुल वाजविण्याचा घाट घातला आहे. १ नोव्हेंबर ते १२ जानेवारी दरम्यान सीएम चषक नावाने या क्रीडा स्पर्धा होत आहेत. आयुष्यमान भारत क्रिकेट, जलयुक्त शिवार व्हॉलीबॉल, शेतकरी सन्मान कबड्डी, सौभाग्य खो-खो, उडान अ‍ॅथलेटिक्स , मुद्रा योजना बुध्दिबळ, स्वच्छ भारत कुस्ती आणि कौशल्य भारत कॅरम या नावातूनच आपल्या सरकारच्या योजनांचा प्रसार करण्याचा भाजपाचा मानस स्पष्ट दिसत आहे.
राज्याच्या क्रिडा आणि शालेय शिक्षण विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांपासून शिक्षकांपर्यंत आणि संघटकांनाही यासाठी जुंपण्यात येईल. खेलो महाराष्टÑ अभियान नावाने या स्पर्धेच्या नियोजनासाठी मंगळवारी क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत विशेष मार्गदर्शन सभेचे म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेत १० क्रीडा व ५ सांस्कृतिक स्पर्धाही होतील. त्यांची नावेही भाजपा सरकारच्या विविध योजनांचीच देण्यात आली आहे. उज्वला नृत्य स्पर्धा, जन-धन एकांकिा स्पर्धा, उजाला गायन स्पर्धा, ग्रामज्योत काव्यवाचन स्पर्धा, इंद्रधनुष्य चित्रकला स्पर्धा व मेक इन इंडिया रांगोळी स्पर्धा नावाने स्पर्धा रंगतील. ‘खेलो इंडीया’च्या धर्तीवर होत असलेल्या या स्पर्धेत १९ वर्षांपर्यंत वयोगट असेल. नवमतदार जोडण्याचा भाजपाचा हा कार्यक्रम आहे, मग त्यासाठी आम्हाला जुंपण्याचे कारण काय असा प्रश्न क्रीडा अधिकाºयांनी केला आहे.
क्रीडा स्पर्धेचे आयोजन हे तालुका व जिल्हा पातळीवर करण्यात येते. परंतु, आगामी निवडणुकांमुळे या स्पर्धा होत असल्याने प्रथमच विधानसभा मतदारसंघ निहाय स्पर्धा होतील. आॅलिम्पिंक व आशियाई तयारीच्या दृष्टीने उद्योनमुख खेळाडूंना प्रोत्साहन व देशाची क्रीडा महाशक्ती निर्माण व्हावी हा या स्पर्धांचा प्रमुख उद्देश असल्याचे म्हटले आहे.
>मुख्यमंत्री कार्यालयातून क्रीडा समन्वयक
या स्पर्धांसाठी विधानसभा मतदारसंघ निहाय थेट मुख्यमंत्री कार्यालयाच्या पातळीवर क्रीडा समन्वयकाची नेमणूक होणार आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, नेहरू युवा केंद्राचे सदस्य आणि क्रीडा शिक्षक समितीसोबत हे समन्वयक काम करणार आहेत. विधानसभा मतदार संघ निहाय समितीची बैठक घेण्यात यावी. स्थानिक खेळाडू, क्रीडा मंडळे, एकविध खेळ संघटना यांचे सहकार्य घ्यावे. प्रायोजकत्व मिळवावे, असेही सांगण्यात आले आहे.
खेलो महाराष्टÑ स्पर्धेची बैठक मंगळवारी होणार आहे. क्रीडा खात्यातील अधिकाºयांबरोबर मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी आणि पक्षाचे पदाधिकारी चर्चा करणार आहेत. स्पर्धा विधानसभा मतदारसंघ निहाय होतील.
- आमदार योगेश टिळेकर, समन्वयक, सीएम चषक खेलो महाराष्टÑ स्पर्धा