शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
2
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
3
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
4
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
5
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
6
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
7
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
8
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
9
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
10
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
11
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
12
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
13
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
14
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
15
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
16
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
17
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
18
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
19
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
20
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘ह्युज’च्या पार्श्वभूमीवर ‘अ‍ॅडिलेड’ आव्हानात्मक

By admin | Updated: December 5, 2014 23:46 IST

आॅस्ट्रेलियन फलंदाज फिलिप ह्युजच्या अपघाती मृत्यूचा प्रभाव भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यान पुढील आठवड्यापासून प्रारंभ होणाऱ्या कसोटी मालिकेवर पडणार असल्याचे संकेत मिळत आहे

सिडनी : आॅस्ट्रेलियन फलंदाज फिलिप ह्युजच्या अपघाती मृत्यूचा प्रभाव भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यान पुढील आठवड्यापासून प्रारंभ होणाऱ्या कसोटी मालिकेवर पडणार असल्याचे संकेत मिळत आहे. यजमान संघाचे खेळाडू अ‍ॅडिलेड ओव्हलवर दाखल होतील त्यावेळी त्यांच्या मनावर आपल्या सहकाऱ्याच्या अपघाती मृत्यूच्या आठवणी दाटून येणार आहेत.
आॅस्ट्रेलियन खेळाडू ज्यावेळी पहिल्या कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरतील त्यावेळी काळी पट्टी बांधून आणि दोन मिनिटांचे मौन पाळून ह्युजला श्रद्धांजली अर्पण करण्याची त्यांची इच्छा राहील, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
या दुख:द घटनेच्या मालिकेत प्रतिस्पर्धी म्हणून काही प्रभाव पडणार नाही, हे मात्र निश्चित. अ‍ॅडिलेडनंतर ब्रिस्बेन, मेलबोर्न आणि सिडनीमध्ये कसोटी खेळल्या जाणार आहेत. डॅरेन लेहमन यांच्या मार्गदर्शनाखाली आॅस्ट्रेलियन संघ आक्रमक झाला आहे. मिशेल जॉन्सनचे बाऊंसर संघासाठी महत्त्वाचे अस्त्र आहे.
उभय संघांच्या कर्णधारांबाबत अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही. अंगठ्याला झालेल्या दुखापतीतून सावरत असलेला भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी शुक्रवारी रात्री उशिरा आॅस्ट्रेलियात दाखल होणार आहे तर हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरत असलेला आॅस्ट्रेलियन कर्णधार मायकल क्लार्क पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार अथवा नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
यापूर्वी, आॅस्ट्रेलियात छाप सोडणारे सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण आता संघात नसल्यामुळे युवा ब्रिगेडपुढे ही कसोटी मालिका म्हणजे आव्हान ठरणार आहे.
यजमान संघात जॉन्सन, रॅन हॅरिस आणि पिटर सिडल या गोलंदाजांमध्ये सामन्याचा निकाल फिरविण्याची क्षमता आहे. भारतातर्फे ईशांत शर्मा गोलंदाजांचे नेतृत्व करणार आहे. ह्युजच्या मृत्यूच्या घटनेमुळे मालिकेवर प्रभाव पडणार आहे. त्यामुळे यावेळी ‘मंकीगेट’सारखा वाद निर्माण होण्याची शक्यता धुसर आहे. उभय संघांच्या आक्रमकतेमध्ये थोडासा प्रभाव पडणार आहे. (वृत्तसंस्था)