शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
2
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
3
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
4
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
5
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
6
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
7
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
8
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
9
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
10
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
11
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
12
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
13
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
14
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
15
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
16
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
17
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
18
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
19
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
Daily Top 2Weekly Top 5

युरो चषकात मध्ये ‘स्टार्स’ची गैरहजेरी

By admin | Updated: June 10, 2016 03:53 IST

फुटबॉलपटूसाठी वाईट स्वप्नासारखेच असते आणि या आठवड्यात सुरू होत असलेल्या युरो कपमध्येदेखील काही स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे चाहत्यांना हाती निराशा पडणार आहे.


पॅरिस : मोठ्या स्पर्धेत खेळू न शकणे हे कोणत्याही फुटबॉलपटूसाठी वाईट स्वप्नासारखेच असते आणि या आठवड्यात सुरू होत असलेल्या युरो कपमध्येदेखील काही स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे चाहत्यांना हाती निराशा पडणार आहे.
मैदानावर आपला वेग आणि त्याच्या जोडीला आक्रमकतेसाठी ओळखला जाणारा जर्मनीचा मिडफिल्डर मार्को रियूस दुखापतीमुळे युरो कपमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. पाय आणि पायाच्या घोट्याच्या दुखापतीमुळे त्याला २0१0 आणि २0१४ च्या फिफा वर्ल्डकप स्पर्धेतही खेळता आले नव्हते.
आघाडीच्या फुटबॉलपटंूमध्ये समाविष्ट असणारा हॉलंडचा कर्णधार आर्जेन रॉबेन हादेखील युरो कपमध्ये खेळताना दिसणार नाही. हॉलंडचा संघ स्पर्धेसाठी पात्र न ठरू शकणाऱ्या तुल्यबळ संघांपैकी एक आहे. स्पर्धेत हॉलंडचा संघ नसल्यामुळे प्रेक्षक मैदानात आर्जेनची जादू पाहण्यापासून वंचित राहतील.
युरो कपमध्ये खेळू न शकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत बेल्जियमचा कर्णधार विन्सेंट कोम्पनी व स्पेनचा डिएगो कोस्टादेखील आहेत. दुखापतीशी संघर्ष करीत असणाऱ्या या खेळाडूंना आपला या वेळेस जलवा दाखविण्याची संधी मिळणार नाही.
>११ जूनपासून सुरू होणाऱ्या युरो कप २0१६ मध्ये यजमान फ्रान्सला स्टार स्ट्रायकर करीम बेनजेमा याच्या अनुपस्थितीमुळे जोरदार धक्का बसला आहे.
जगातील सुरेख स्ट्रायकर्समध्ये गणला जाणारा
२८ वर्षीय बेनजेमाला फ्रान्स फुटबॉल महासंघाने सहकारी खेळाडू मॅथ्यू वल्बुएना याला ब्लॅकमेल करण्याच्या आरोपामुळे निलंबित केले आहे.
त्यामुळे फुटबॉलप्रेमींना त्याचा जलवा पाहण्याची संधी मिळणार नाही.