अफ्रिकेचे ८ गडी तंबूत, भारताची विजयाच्या दिशेने वाटचाल

By Admin | Updated: December 7, 2015 14:49 IST2015-12-07T11:29:54+5:302015-12-07T14:49:37+5:30

भारताच्या ४८१ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ १२० धावांमध्ये तंबूत परतला आहे.

8 wickets in Africa, India move towards victory | अफ्रिकेचे ८ गडी तंबूत, भारताची विजयाच्या दिशेने वाटचाल

अफ्रिकेचे ८ गडी तंबूत, भारताची विजयाच्या दिशेने वाटचाल

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ७ - भारताच्या ४८१ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचे ८ गडी तंबूत परतले असून भारताची वाटचाल विजयाच्या दिशेने होत आहे. चहापानानंतर भारताने अफ्रिकेच्या डेन व्हिलासचा उमेश यादवने त्रिफळा उडवला आणि अश्विनने ए. बी. डिव्हिलियर्सला जाडेजाकरवी झेलबाद करत मुख्य अडथळा दूर केला. पाठोपाठ अॅबटचाही त्रिफळा उमेश यादवने उडवला आणि अफ्रिकेची अवस्था १४१ षटकांमध्ये १४० धावांमध्ये ८ बाद अशी झाली आहे.

खेळपट्टीवर टिच्चून फलंदाजी करणारा कर्णधार आमला (२५) तसेच ड्यू प्लेसिस (१०) व ड्युमिनी शून्यावर बाद झाला.  अश्विनने ४ गडी बाद केले असून जाडेजा व उमेश यादवने प्रत्येकी २ गडी बाद केले आहेत.

दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू भारताविरुद्धची चौथी कसोटी अनिर्णित राखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीत आफ्रिकेसमोर विजयासाठी ४८१ धावांचे विशाल आव्हान आहे, मात्र कालप्रमाणेच आफ्रिकेचे फलंदाज आजही टुकूटुकू खेळ करत असून कसोटी अनिर्णीत राखण्याकडे त्यांचा कल आहे.

अजिंक्य रहाणेच्या दोन्ही डावांतील शतकांचं भारत जिंकला तर चीज होणार असून तशी शक्यता दिसत आहे.

Web Title: 8 wickets in Africa, India move towards victory