शहरं
Join us  
Trending Stories
1
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
2
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
3
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
4
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
5
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
6
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
7
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
8
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
9
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
10
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
11
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
12
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
13
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
14
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
15
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
16
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
17
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
18
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
19
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
20
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

३३व्या वर्षीही फेडएक्स्प्रेस सुसाट

By admin | Updated: November 24, 2014 02:50 IST

३३ वर्षांची फेडएक्स्प्रेस आजही सुसाट असल्याची प्रचिती रविवारी अनुभवायला मिळाली. रॉजर फेडररच्या झंझावाती खेळासमोर फ्रान्सच्या रिचर्ड गॅस्कुएटला तग धरण्यात अपयश आले.

फ्रान्स : ३३ वर्षांची फेडएक्स्प्रेस आजही सुसाट असल्याची प्रचिती रविवारी अनुभवायला मिळाली. रॉजर फेडररच्या झंझावाती खेळासमोर फ्रान्सच्या रिचर्ड गॅस्कुएटला तग धरण्यात अपयश आले. फेडीने ही लढत ६-४, ६-२, ६-२ अशी जिंकून स्वित्झर्लंडला पहिल्यावहिल्या डेव्हिस चषक जेतेपदाचा मान मिळवून दिला. स्वित्झर्लंडने ही स्पर्धा ३-१ अशी जिंकली. १९९२ नंतर स्वित्झर्लंडने पहिल्यांदा डेव्हिस चषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता आणि हा जेतेपदाचा दुष्काळ संपविण्यात आज त्यांना यश मिळाले.१७ वेळा ग्रॅण्ड स्लॅम पटकावणाऱ्या फेडररला गत आठवड्यात पाठीच्या दुखापतीने त्रस्त केले होते. शुक्रवारी या दुखापतीतून सावरत कोर्टवर उतरलेल्या फेडररला फ्रान्सच्या गाएल मोनफिल्सकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे परतीच्या सामन्यात फेडररने दमदार कमबॅक केले. २७ हजार ४४८ प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या लढतीत फेडररने अप्रतिम खेळ करून सर्वांची मने जिंकली. या जेतेपदासाठी आम्ही कडवी झुंज दिली. गेली १५ वर्षे मी या स्पर्धेत खेळत आहे आणि जेतेपदाच्या इतक्या जवळ या पूर्वी कधी आलो नव्हतो, असे मत फेडररने सामना झाल्यानंतर व्यक्त केले. तो म्हणाला, या विजयाचा आनंद शब्दात सांगणे कठीण आहे. अंतिम लढतीच्या पहिल्या सामन्यात स्वित्झर्लंडच्या स्टान वावरिंकाने ६-१, ३-६, ६-३, ६-२ अशा फरकाने जो विलफ्रिड त्सोंगाचा पराभव करून सामन्यात १-० अशी आघाडी घेतली. मात्र दुसऱ्याच सामन्यात फ्रान्सच्या गाएल मोनफिल्सने ६-१, ६-४, ६-३ असे दुखापतग्रस्त फेडररला पराभूत केले आणि लढत १-१ अशी बरोबरीत आणली. एकेरीतील पराभवाचा वचपा फेडररने वावरिंकासह दुहेरी लढतीत काढला. या जोडीने ज्युनियन बेनेतू आणि रिचर्ड गेसक्वेट यांचा सलग सेटमध्ये पराभव करून आघाडी २-१ अशी मजबूत केली. फेडररने परतीच्या लढतीत बाजी मारून स्वित्झर्लंडला पहिल्या डेव्हिस चषकाचे जेतेपद पटकावून दिले. (वृत्तसंस्था)