शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

२१ वर्षीय सिंधूने ३ महिने वापरला नाही मोबाईल

By admin | Updated: August 20, 2016 16:34 IST

रिओ ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये 'रौप्य' पदक पटकावत इतिहास रचणा-या पी.व्ही.सिंधूने अनेक आवडत्या गोष्टींचाही त्याग केला होता.

ऑनलाइन लोकमत
रिओ दि जानेरो, दि. २० - रिओ ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये 'रौप्य' पदक पटकावत इतिहास रचणा-या पी.व्ही.सिंधूमुळे देशभरात आनंदाचे वातावरण आहे. मात्र  हे यश मिळवण्यासाठी सिंधूने प्रयत्नांची पराकाष्ठा करत अनेक आवडत्या गोष्टींचाही त्याग केला. सिंधूने तिचे आवडते पदार्थ हैदराबादी बिर्याणीचा त्याग केला तसेच आजच्या काळातील प्रत्येकाची मूलभूत गरज असलेल्या मोबाईलला सिंधूने तीन महिने हातही लावला नाही.
 आणखी वाचा : 
(रुपेरी सिंधू !)
  •  
 (पराभवानंतर सिंधूने जे केलं त्यामुळे तुम्हालाही अभिमान वाटेल)
 
  •  
पी. गोपीचंद हे अतिशय कडक शिस्तीचे प्रशिक्षक असून ऑलिम्पिकसाठी तयारी करणा-या सिंधूने त्यांच्या निगराणीखाली अथक मेहनत घेत सराव केला. सर्वोत्तम गोष्ट साध्य करायची असेल तर जीवनातील लहानसहान आनंदांचा त्याग केला पाहिजे, हे गोपीचंद यांचे सूत्र असून त्यांनी गेल्या काही महिन्यांत कडक शिस्तीत सिंधूकडून सराव करून घेतला .
एकाग्रता भंग करणाऱ्या तसेच मानसिक स्थिती बिघडवू शकणाऱ्या समाजमाध्यमांना सिंधूने स्वत:हून दीड महिना रामराम ठोकला. मात्र, काल रौप्य पदक  जिंकल्यानंतर पी. गोपीचंद  यांनी सिंधूला हवे तितके आईस्क्रीमही खाण्याची सूट दिली असून तिचा मोबाईल परत करणार असल्याचे सांगितले. रिओत दाखल झाल्यापासून मी तिच्या गोड खाण्यावर विशेषत: आईस्क्रीम खाण्यावर बंदी घातली होती. मात्र, आता सिंधू तिला हवे ते खाऊ शकणार आहे, असे गोपीचंद यांनी नमूद केले. 
 
कसे झाले सिंधूचे प्रशिक्षण
- ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर सिंधूला तिची आवडती चॉकलेट्स आणि हैदराबादी बिर्याणी खाण्यावर प्रतिबंध घालण्यात आला होता. तसेच देवाचा प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थावरही बंदी घालण्यात आली.
 - उत्तेजकांसंदर्भातील कठोर नियमांमुळे सिंधूला बाहेरचं पाणी पिण्यासदेखील मज्जाव करण्यात आला होता. 
- सिंधूला एकटीने जेवण्यास परवानगी नव्हती, पी. गोपीचंद यांच्याबरोबरच भोजन घेणं अनिवार्य होते,  खाद्यपदार्थातून काहीही दिले जाऊ शकते या पार्श्वभूमीवर ही उपाययोजना करण्यात आली.
-  उंच उडी मारून प्रतिस्पध्र्याच्या दिशेने शरीरवेधी स्मॅश मारण्यासाठी गोपीचंद यांनी सिंधूचा खास सराव करून घेतला. सिंधूची उंची जास्त असल्याने प्रतिस्पर्धी तिला फटक्यांसाठी खाली वाकायला भाग पाडण्याची रणनीती आखतात. हे लक्षात घेऊन प्रदीर्घ रॅली आणि उंचीवरचे फटके खेळण्यावर भर राहील अशी रणनीती गोपीचंद यांनी आखली.
-  तासाभरापेक्षा जास्त काळ चालणाऱ्या लढतींसाठी सक्षम राहण्यासाठी गेले वर्षभर व्यायामशाळेत वजन उचलण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. 
- रिओमध्ये खेळणा-या तरूणासोबत गोपीचंद यांनी स्वत: सराव केला. त्यासाठी त्यांनी गेल्या ८ महिन्यांपासून स्वत:च्या आहारात बदल करत वजन कमी केलं. तसेच त्यांनी त्यांच्या अकदामीमध्ये साखर व पावावर बंदी घालण्यात आली आहे.