शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

२००९ - अंडरडॉग डेक्कन चार्जर्सची चमकदार कामगिरी

By admin | Updated: April 8, 2015 14:56 IST

दक्षिण आफ्रिकेत रंगलेल्या आयपीएलच्या दुस-या पर्वात अंडरडॉग हैद्राबाद डेक्कन चार्जर्सने विजेतेपद पटकावले.

एप्रिल २००९ मध्ये भारतात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना आयपीएलच्या दुसरे पर्व रंगणार होते. निवडणुकीचा ताण असल्याने सुरक्षा यंत्रणांनी आयपीएलला सुरक्षा पुरवण्यात असमर्थता दर्शवली. त्यामुळे आयपीएलचे दुसरे पर्व संकटात सापडले होते. पण ललित मोदींनी 'मोदी'बाणा जपत आयपीएल सातासमुद्रापार म्हणजेच थेट दक्षिण आफ्रिकेत भरवण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डानेही बीसीसीआयला होकार कळवल्याने आयपीएलचे सीमोल्लंघन शक्य झाले. 
१८ मार्च २००९ मध्ये केपटाऊन येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज सामन्याने दुस-या पर्वाची सुरुवात झाली. हा सामना मुंबई इंडियन्सने १९ धावांनी जिंकला. पहिल्या पर्वात गुणतालिकेत तळावर असलेल्या डेक्कन चार्जर्सने दुस-या पर्वात कमालच केली. अ‍ॅडम गिलख्रिस्टच्या नेतृत्वाखाली खेळणा-या डेक्कन चार्जर्सने थेट अंतिम फेरीत धडक मारली. फायनलमध्ये डेक्कन चार्जर्सचा सामना होता तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुशी.  रोमहर्षक सामन्यात डेक्कन चार्जर्सने बंगळुरुवर सहा धावांनी विजय मिळवला. डेक्कन चार्जसने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ६ गडी गमावून १४३ धावा केल्या. डेक्कन चार्जर्सच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत बंगळुरुचा डाव २० षटकांत १३७ धावांवर रोखला व संघाला विजेतेपद मिळवून दिले. विशेष म्हणजे दुस-या पर्वातही विजेतेपद पटकावणा-या संघाचे नेतृत्व ऑस्ट्रेलियन खेळाडूनेच केले. गिलख्रिस्टची झंझावाती फलंदाजी हैद्राबाद डेक्कन चार्जर्ससाठी फलदायी ठरली.