शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट शहरातही महिला असुरक्षितच

By admin | Updated: January 11, 2016 02:12 IST

सुनियोजित शहर म्हणून लौकिक असणाऱ्या पनवेलसह नवी मुंबईमध्येही महिला असुरक्षितच असल्याचे स्पष्ट झाले आहे. २००४ पासून ४६३ बलात्काराचे गुन्हे

नामदेव मोरे,  नवी मुंबईसुनियोजित शहर म्हणून लौकिक असणाऱ्या पनवेलसह नवी मुंबईमध्येही महिला असुरक्षितच असल्याचे स्पष्ट झाले आहे. २००४ पासून ४६३ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले असून विनयभंगाच्या ७६२ घटनांची विविध पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली आहे. १२ वर्षांत गुन्ह्यांमध्ये सहा पट वाढ झाली असून ७० टक्के घटनांमध्ये ओळखीच्या व्यक्तीनेच गुन्हा केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. सण, उत्सवांनाही दागिने घालण्याची भीती वाटू लागली आहे. रोज जवळपास दोन ठिकाणी घरफोडी होत असून बहुतांश ठिकाणी दागिने चोरीला जात असल्याने त्याचा सर्वाधिक धक्का महिलांनाच बसत आहेत. यामुळे नवी मुंबईमध्येही महिला सुरक्षित नसल्याची भावना निर्माण होवू लागली आहे. पोलिसांकडील आकडेवारी पाहिल्यानंतर महिलांवरील अत्याचाराच्या घटना १२ वर्षांत सहा पट वाढल्या आहेत. २००४ मध्ये पनवेल, नवी मुंबई व उरण परिसरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचे १७ व विनयभंगाचे ३३ गुन्हे दाखल झाले होते. २०१५ मध्ये बलात्काराच्या १०४ व विनयभंगाच्या २०२ घटनांची नोंद झाली आहे. २०१२ पर्यंत महिलांवरील अत्याचाराच्या महिन्याला एक किंवा दोन तक्रारी दाखल होत होत्या. अनेक वेळा महिलांवर अत्याचार होवूनही समाजात बदनामी होवू नये यासाठी गुन्हे दाखल केले जात नाहीत. विनयभंगाच्याही अनेक तक्रारी दाखल होत नव्हत्या. परंतु दिल्लीमधील निर्भया प्रकरणानंतर पीडित महिला तक्रारी करण्यासाठी पुढे येवू लागल्या आहेत. पोलीसही महिलांविषयी गुन्हे तत्काळ नोंदवून तपास सुरू करत आहेत. २०१२ मध्ये अतिप्रसंगाचे ३५ गुन्हे दाखल होते. २०१३ मध्ये ही संख्या ६८ झाली. गतवर्षी दाखल गुन्ह्यांची संख्या १०४ वर गेली आहे. पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनीही वार्षिक आढाव्याची माहिती देताना सांगितले की, महिलांवर अतिप्रसंग व विनयभंगाच्या ७० टक्के घटनांमध्ये परिचित व्यक्तीच आरोपी असल्याचे निदर्शनास आले असल्याचे स्पष्ट केले. नवी मुंबईमध्ये गत १२ वर्षामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या अनेक प्रकरणांमुळे खळबळ उडाली होती. २००५ मध्ये नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधातच गुन्हा दाखल झाला होता. यानंतर २००७ मध्ये पारसिक हिल टेकडीवर फिनलँड देशातील महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातील आरोपी अद्याप सापडलेले नाहीत. २०१३ मध्ये कोपरीमध्ये पाच वर्षांच्या मुलीवर अतिप्रसंग करून खून केल्याच्या घटनेचा राज्यभर निषेध झाला होता. यामधील आरोपीवर जलद न्यायालयात खटला चालवून दीड वर्षात फाशीची शिक्षा सुनावली होती. या सर्व घटनांमुळे नवी मुंबईमध्येही महिला असुरक्षित असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. उघड्यावरील मद्यपान थांबवावेशहरामध्ये बियर शॉपच्या बाहेर उभे राहून बिनधास्तपणे मद्यपान सुरू असते. नेरूळ रेल्वे स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारावरच मद्यविक्रीचे दुकान आहे. दुकानासमोर उभे राहून मद्यपान सुरू असते. सानपाडा व इतर ठिकाणीही अशीच स्थिती आहे. टपोरी व गुंडप्रवृत्तीचे तरूण मद्यपान करून महिलांची छेडछाड काढत असल्याच्या घटना होत असून उघड्यावरील मद्यपान थांबविण्याची मागणी केली जात आहे.