शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 08:58 IST

सर्वांचे लक्ष निर्णयाकडे

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून गंभीर पावले उचलली जात आहे.   राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, ३ नोव्हेंबरला सह्याद्री अतिथीगृहात महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे. बैठकीत सिडकोच्या विविध हाउसिंग योजनांतील घरांच्या किमतीत सुमारे दीड ते दोन लाख रुपयांची कपात करण्याची शक्यता सूत्राने वर्तवली आहे.

८ महिन्यांपासून ‘माझ्या पसंतीचे सिडकोचे घर’ योजनेंतर्गत लॉटरीद्वारे जाहीर केलेल्या घरांच्या दरांविषयी नाराजी व्यक्त आहे. सोडतधारकांनी परवडत नसलेल्या दरांविरोधात निदर्शने, निवेदने सादर केली होती. या पार्श्वभूमीवर घरांच्या किमतीबाबत पुनर्विचार करण्यासाठी ही महत्त्वाची बैठक बोलाविण्यात आली आहे. 

सर्वांचे लक्ष निर्णयाकडे

सिडकाेच्या माझ्या पसंतीचे घर या याेजनेंतर्गत घरांच्या किमतीवर ग्रहाकांनी आक्षेप घेतला. याला प्रतिसाद मिळत नसल्याने शासनाने यावर ताेडगा काढण्यासाठी बैठक घेतली आहे. या बैठकीत किमती कमी करण्याचा निर्णय हाेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दर कपातीचा निर्णय झाल्यास हजारो सोडतधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचा ठरेल, अशी राजकीय चर्चा आहे. बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार शशिकांत शिंदे, आमदार विक्रांत पाटील तसेच सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल उपस्थित राहणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : CIDCO Homes Likely to Get Cheaper: Price Cut Meeting Today

Web Summary : CIDCO house prices may fall by ₹1.5-2 lakhs following a government meeting. Unhappy with current rates, lottery winners protested. A price reduction could greatly benefit thousands and impact upcoming elections. Key ministers and CIDCO officials will attend the meeting.
टॅग्स :cidcoसिडको लॉटरीHomeसुंदर गृहनियोजन