शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कामोठेतील पाण्याचे गणित सुटणार !

By admin | Updated: December 9, 2015 00:59 IST

गेली कित्येक महिने सुरू असलेल्या कामोठेवासीयांच्या पाणीप्रश्नावर अखेर तोडगा निघाला असून मंगळवारी कामोठेतील रहिवाशांनी सिडकोच्या

नवी मुंबई : गेली कित्येक महिने सुरू असलेल्या कामोठेवासीयांच्या पाणीप्रश्नावर अखेर तोडगा निघाला असून मंगळवारी कामोठेतील रहिवाशांनी सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांशी या समस्येवर चर्चा केली. बैठकीत पाणी वाटपाचे चुकलेले गणित सोडवून कामोठेतील प्रत्येक विभागात समान पाणी वाटप केले जाणार असल्याची माहिती या बैठकीत दिली. यावेळी पाण्याची ही गंभीर समस्या सोडविण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी कामोठेवासियांसह सकारात्मक चर्चा केली.कामोठेच्या लोकसंख्येनुसार ४२ एमएलडी पाण्याची आवश्यकता असूनही २४ एमएलडी पाणी पुरविण्यात येत असल्याने गेल्या कित्येक महिन्यांपासून कामोठेतील नागरिकांना पाण्याच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. टँकर लॉबीलाही या ठिकाणी बंदी आल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. नागरिकांनी पाणी समस्येवर अनेकदा सिडकोला घेराव घातला, अधिकाऱ्यांशी चर्चा केली तरी प्रश्न आणखीनच चिघळत गेला. या ठिकाणी सिडकोच्या वतीने २७ नवीन प्रकल्प उभारणार आहे. सद्यस्थितीत नागरिकांना वापरासाठी पुरेसे पाणी उपलब्ध नाही तर नव्याने येणाऱ्या प्रकल्पासाठी पाणी कुठून येणार? असा प्रश्नही नागरिकांनी सिडको प्रशासनाला विचारला. सिडकोचे अधीक्षक अभियंता रमेश गिरी यांनी या पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी सहा उपाययोजना सुचविल्या. पाणीकपातीचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन गिरी यांनी दिले. पंपिंग सिस्टीम सुधारण्याकरिता विशेष पाहणी केली जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. (प्रतिनिधी)