शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलकरांवर पाणीकपातीचे संकट

By admin | Updated: January 4, 2016 02:10 IST

जलसाठ्यांची पातळी खालावल्याने सर्वत्र पाणीकपात करण्यात आली आहे. नवी मुंबईत सिडकोने आपल्या कार्यक्षेत्रात पाणीकपात घोषित केली आहे

पनवेल : जलसाठ्यांची पातळी खालावल्याने सर्वत्र पाणीकपात करण्यात आली आहे. नवी मुंबईत सिडकोने आपल्या कार्यक्षेत्रात पाणीकपात घोषित केली आहे. पनवेल नगरपालिका देखील लवकरच पाणीकपात करणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून मिळाली आहे. त्यामुळे नव्या वर्षाच्या सुरु वातीलाच पनवेलकरांसमोर पाणीकपातीचे संकट उभे राहाणार आहे . पनवेल नगरपालिकेच्या मालकीचे असलेल्या देहरंग धरणातून पनवेल, नवीन पनवेल शहराला पाणी पुरवठा करण्यात येतो. दिवसाला २७ एमएलडीहून अधिक पाणी देहरंग धरण, एमजेपी आणि एमआयडीसीकडून पनवेल शहराला पुरवले जाते. या जलाशयात एकूण ३.५७ दशलक्ष घनमीटर पाणी साठवून ठेवण्याची क्षमता होती. मात्र पावसाळ्यात माथेरानच्या डोंगराहून पाण्याबरोबर वाहत येणारा गाळ धरणात बसल्यामुळे खोली कमी होत आहे. परिणामी धरणाची पाणी साठवण क्षमताही कमी झाली आहे. शहराला सुमारे २७ एमएलडी पाण्याची गरज असून, ९ ते १० एमएलडी देहरंग धरणातून मार्चपर्यंत मिळते. उर्वरित पाणी एमजेपी व एमआयडीकडून विकत घेण्यात येते. गाढेश्वर धरणाची नगर परिषदेच्या मालकीची २७७ एकर जमीन असून, त्यातील १२५ क्षेत्रावर देहरंग धरण वसलेले आहे. नगरपालिकेच्या मालकीची २७७ एकर जमिनीला अद्याप संरक्षक भिंतदेखील बांधली नाही. तसेच अर्ध्याहून अधिक जागेत धरणाचे पाणी साचत नाही.पूर्वी धरणाची साठवणूक क्षमता जास्त होती. २००५ मध्ये आलेल्या पुरामुळे माथेरानच्या डोंगरावरील माती वाहत येऊन ती गाढेश्वर धरणात जमा झाली. त्यामुळे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता कमी झाली. याचा परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर झाला. पनवेल शहराची पाण्याची गरज दुप्पट , ती भागवण्यासाठी नगरपालिकेला एमजेपी, एमआयडीसी आणि सिडकोवर अवलंबून राहावे लागते. नव वर्षात पाणीकपातीचे संकेत मिळाले आहेत. मात्र नेमकी किती टक्के पाणीकपात करायची, याबाबत अद्याप स्पष्ट झाले नाही. (प्रतिनिधी)