शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

वाळीत प्रकरणी उशिराने जाग

By admin | Updated: December 12, 2014 02:16 IST

रोहे तालुक्यातील गावक:यांनी वाळीत टाकलेल्या मोहिनी तळेकर या विधवेच्या आत्महत्त्येबाबत राज्य मानवी हक्क आयोगाने रायगडच्या जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनाला चांगलेच फटाकरले.

आविष्कार देसाई ल्ल रोहा
रोहे तालुक्यातील गावक:यांनी वाळीत टाकलेल्या मोहिनी तळेकर या विधवेच्या आत्महत्त्येबाबत राज्य मानवी हक्क आयोगाने रायगडच्या जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनाला चांगलेच फटाकरले. आयोगाच्या दट्ट्य़ानंतर दोन्ही विभागप्रमुख आता खडबडून जागे झाले आहेत. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी ते संबंधीत भागाला भेट देणार आहेत.
रोहे तालुक्यातील खाजणी गावात मोहिनी तळेकर (4क्) दोन मुलांसह राहत होत्या. त्यांना गावक:यांनी वाळीत टाकल्याने त्यांनी 18 नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली. तळेकर यांच्यावर अत्याचार होत असल्याचे समजले तेव्हा आयोगाचे अध्यक्ष न्या. बत्रुरमठ यांनी दोषींविरोधात गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले होते. तसेच वाळीत प्रकरणाला आळा बसवा यासाठी काही शिफारसी केल्या होत्या. तळेकर यांची मुले होळीच्या सणात सहभागी होत नसल्याने त्यांना गावक:यांनी वाळीत टाकले होते. याप्रकरणी रोहे पोलिसांनी 31 जणांविरोधात गुन्हा नोंदविला. तसेच गावातील एका मारहाणीच्या प्रकरणात तळेकर यांनी गुन्हेगारांना पकडण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यामुळे मोहिनी तळेकर यांना विवस्त्र करून त्यांची गावातून धिंड काढली होती. त्यानंतरही त्यांच्यावर अत्याचार सुरूच होते. सततच्या जाचाला कंटाळून अखेर 18 नोव्हेंबरला तळेकर यांनी आत्महत्या केली. गावक:यांच्या अमानूष अत्याचाराला कंटाळूनच त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप तळेकर यांच्या नातेवाईकांनी  केला आहे. जिल्हा प्रशासन अथवा पोलीस प्रशासनाने यामध्ये वेळीच हस्तक्षेप केला असता, तर तळेकर यांचा मृत्यू झाला नसता. याची मानवी आयोगाने दखल घेतली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे आणि जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांना दोन आठवडय़ात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आयोगाच्या दट्ट्य़ानंतर आता दोन्ही अधिकारी पुढील आठवडय़ात या ठिकाणी पोचणार आहेत.
 
मोहिनी तळेकर यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून 31 ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पाच आरोपींना रोहा पोलिसांनी अटक केली आणि न्यायासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. आरोपींमध्ये महेश लोंढे, मंगेश लोंढे, दशरथ गायकर, साईनाथ तळेकर व कृष्णा भगत यांचा समावेश आहे. 
उर्वरित 26 आरोपी पसार झाले आहेत. पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे, मात्र खाजणी येथील तळेकर यांच्या आत्महत्येस मालमत्ता आणि पैशांचा व्यवहारही कारणीभूत असल्याचे परिसरातील बोलले जात आहे. त्यामुळे रोहा पोलिसांनी त्या दिशेनेही या आत्महत्येचा तपास करावा अशी मागणी होत आहे.  
 
उशिरा सुचलेले शहाणपण
जिल्ह्यात अनेक वाळीत प्रकरणो 
समोर आली आहेत. त्यामुळे पोलिस अधिक्षक, मुख्यकार्यकारी अधिकारी, समाज कल्याण अधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार, ग्रामसेवक, तलाठी, सर्कल, पोलिस पाटील, सरपंच, आमदार, खासदार, प्रसारमाध्यमे यांनी वाळीत प्रकरणाबाबत जनजागृतीपर कार्यक्रमात सहभागी व्हावे, यासाठी जिल्हाप्रशासनाने कार्यक्रम 
आखला आहे.
 
अहवाल मागितला आहे. अधिकारी पुढच्या आठवडय़ात घटनास्थळी जाणार आहेत. त्यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. महावरकर येणार आहेत. परिस्थीतीचे अवलोकन करून याबाबत योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे सुमंत भांगे यांनी सांगितले.
 
पोलिसांनी आपले काम केले आहे. सामाजिक बहिष्काराचा विषय खूपच संवेदनशील आहे. संबंधीतावर काय कारवाई करायची याचा सर्वस्वी जिल्हाधिका:यांचा निर्णय आहे. सध्या तपास सुरू आहे, अशी माहिती रायगडचे जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांनी दिली.