शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
3
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
4
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
5
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
6
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
7
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
8
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
9
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
10
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
11
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
12
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
13
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
14
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
15
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
16
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
17
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
18
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
19
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
20
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
Daily Top 2Weekly Top 5

व्हीआयपी सुरक्षेविना

By admin | Updated: September 4, 2015 00:24 IST

संपुआच्या काळातील ६० पेक्षा जास्त व्हीव्हीआयपींची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. देशभरातील व्हीआयपींना पुरविलेल्या सुरक्षेचा आढावा घेताना

नबीन सिन्हा,नवी दिल्लीसंपुआच्या काळातील ६० पेक्षा जास्त व्हीव्हीआयपींची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. देशभरातील व्हीआयपींना पुरविलेल्या सुरक्षेचा आढावा घेताना केंद्रीय गृहमंत्रालयाने मोठ्या प्रमाणात फेरबदलाची प्रक्रिया अवलंबली आहे. महाराष्ट्रातील तीन माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना केंद्रीय सुरक्षा कवच असलेल्या यादीतून वगळण्यात आले आहे.माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे नातेवाईक, लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीरा कुमार यांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून (सीआयएसएफ) दिल्या जाणाऱ्या सुरक्षेचा दर्जा कमी करण्यात आला आहे. गृहमंत्रालयाने २१ आॅगस्ट रोजी व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेचा बारकाईने आढावा घेतला. संपुआ सरकारमधील अनेक माजी केंद्रीय मंत्री आणि घटनात्मक पदे भूषविणाऱ्या अधिकाऱ्यांची सुरक्षा पूर्वीपेक्षा निम्नस्तराची असेल. त्यांना दिल्लीत स्वीय सुरक्षा अधिकारी मिळेल. तसेच मतदारसंघांमध्ये त्यांच्या सोबत तीनपेक्षा जास्त सुरक्षारक्षक असणार नाहीत. सुबोधकांत सहाय, श्रीप्रकाश जयस्वाल, कमलनाथ, जितीन प्रसाद, व्ही. नारायणस्वामी, अंबिका सोनी, मनीष तिवारी, आर.के. धवन, माजी सॉलिसिटर जनरल गोपाल सुब्रमण्यम आदींचा त्यात समावेश आहे. माजी संरक्षणमंत्री ए.के. अ‍ॅन्टनी, आरपीएन सिंग, जितेंद्रसिंग यांच्यासारख्या काही मंत्र्यांनी अशा प्रकारची सुरक्षा नाकारली आहे. माजी मंत्रिमंडळ सचिव अजित सेठ, माजी गृहसचिव अनिल गोस्वामी, मणिपूरचे माजी राज्यपाल व्ही.के. दुग्गल आणि त्यांचे कुटुंबीय, मनमोहनसिंग यांचे माजी सल्लागार टीकेए नायर, नवीन जिंदल, दिल्लीचे माजी नायब राज्यपाल तेजिंदर खन्ना आदींची सुरक्षा काढून घेण्यात आली किंवा कमी केली आहे. वड्रांची विशेष सुरक्षा काढणार काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांची एनएसजी सुरक्षाही कमी करण्याचा विचार केला जात आहे. वड्रा यांना यापूर्वी कोणत्याही विमानतळावर अंगझडती किंवा सुरक्षा तपासणीतून जावे लागत नव्हते. त्यांचा हा विशेष दर्जा अलीकडेच काढून घेण्यात आला. त्यांना सीआयएसएफची सुरक्षा दिली जाईल. मात्र, त्यात चारपेक्षा जास्त जवान असणार नाहीत. या जवानांचे वेतनही त्यांच्याकडून वसूल केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.वड्रांची विशेष सुरक्षा काढणार काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांची एनएसजी सुरक्षाही कमी करण्याचा विचार केला जात आहे. वड्रा यांना यापूर्वी कोणत्याही विमानतळावर अंगझडती किंवा सुरक्षा तपासणीतून जावे लागत नव्हते. त्यांचा हा विशेष दर्जा अलीकडेच काढून घेण्यात आला. त्यांना सीआयएसएफची सुरक्षा दिली जाईल. मात्र, त्यात चारपेक्षा जास्त जवान असणार नाहीत. या जवानांचे वेतनही त्यांच्याकडून वसूल केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.