शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

वाशीत पदपथ बनले धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 02:26 IST

गटारावरील स्लॅब कोसळल्याने वाशीतील पदपथ पादचाºयांसाठी धोकादायक बनले आहेत. रात्रीच्या वेळी या उघड्या गटारांमध्ये पादचारी पडण्याची शक्यता आहे.

नवी मुंबई : गटारावरील स्लॅब कोसळल्याने वाशीतील पदपथ पादचाºयांसाठी धोकादायक बनले आहेत. रात्रीच्या वेळी या उघड्या गटारांमध्ये पादचारी पडण्याची शक्यता आहे. यामुळे गटारांच्या दुरुस्तीसाठी सलग दोन वर्षे प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर कामाची मंजुरी मिळवण्यात लोकप्रतिनिधीला यश आले आहे.वाशी सेक्टर ५ येथील कामगार वसाहतीशेजारील मार्गालगतच्या पदपथाची दयनीय अवस्था झाली आहे. त्याठिकाणच्या सिडकोकालीन गटारांची पडझड सुरू असून अनेक ठिकाणी स्लॅब कोसळले आहे. पदपथाला लागूनच हे गटार असल्यामुळे त्याठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. मागील काही महिन्यांपासून हे गटार उघड्या स्थितीत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी पदपथावरून चालणारी एखादी व्यक्ती गटारामध्ये पडण्याची शक्यता आहे. शिवाय रहिवासी वसाहतीलगतच हे उघडे गटार असल्याने त्यामध्ये साचलेल्या घाणीमध्ये डासांची पैदास होऊन आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु या परिस्थितीला प्रशासन कारणीभूत असल्याचा आरोप नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी केला आहे. परिसरातील गटारांवरील पदपथांची पडझड सुरू असून त्याच्या दुरुस्तीसाठी त्या मागील दोन वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करत होत्या. मात्र प्रशासनाकडून कामाच्या बाबतीत दिरंगाई झाल्याचा त्यांचा आरोप आहे. तर संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पडझड झालेल्या गटारांच्या ठिकाणी बांबू आडवे लावण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. अखेर नुकतीच या पदपथांच्या दुरुस्तीच्या कामाची निविदा निघाली असून गत आठवड्यात ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आले आहेत.