शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

आद्यक्रांतिकारकांच्या पुतळ्याचे अनावरण

By admin | Updated: August 28, 2015 23:35 IST

नगरपरिषदेमार्फत नाट्यगृहात बसविण्यात आलेल्या आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी करण्यात आले.

पनवेल : नगरपरिषदेमार्फत नाट्यगृहात बसविण्यात आलेल्या आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी करण्यात आले. आद्य क्रांतिकारकांच्या पणती ज्योती फडके-सराफ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. नगरपरिषदेमार्फत आद्यक्रांतिकारक फडके नाट्यगृहाच्या प्रवेशद्वाराजवळच कास्टिंगचा पुतळा बसविण्यात आला आहे . याकरिता ३ लाख २५ हजार रुपये खर्च करण्यात आले आहे. मात्र पुतळा बसवून उद्घाटना अभावी अनेक दिवस लाल कपड्यात बांधून ठेवल्यामुळे नागरिकांनी नगरपरिषदेवर नाराजी व्यक्त केली होती. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार होते. मात्र तारखा मिळत नसल्यामुळे नगरपरिषदेमार्फत अनावरणाचा कार्यक्रम लांबविण्यात आला होता. लोकमतमध्ये याबाबत वृत्त प्रसिध्द होताच पनवेल नगरपरिषदेने याची दखल घेतली. शुक्रवारी आद्यक्रांतिकारकांच्या पणती ज्योती फडके-सराफ यांच्या प्रमुख उपस्थितीत पुतळ्याचा अनावरण सोहळा आयोजित केला. यावेळी बोलताना ज्योती फडके सराफ यांनी आद्यक्रांतिकारकांच्या नावाने उभारण्यात आलेल्या नाट्यगृहाचा उपयोग समाजोपयोगी कार्यात होत असल्याचे समाधान व्यक्त केले. नगराध्यक्षा चारुशीला घरत यांनी उपस्थितांचे यावेळी आभार मानले. उपस्थितांमध्ये नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश चितळे, अतिरिक्त मुख्याधिकारी चारुशीला पंडित, उपनगराध्यक्ष मदन कोळी, बांधकाम सभापती मनोहर म्हात्रे, आरोग्य सभापती गणपत म्हात्रे, नगरसेवक लतीफ शेख आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)