शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

अघोषित पाणीकपात

By admin | Updated: December 8, 2015 01:01 IST

मोरबे धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने नवी मुंबईकरांवर अघोषित पाणीकपात करण्याची पाळी प्रशासनावर आली आहे. याचा परिणाम म्हणून शहरवासीयांची एकच तारांबळ उडत आहे

नवी मुंबई : मोरबे धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने नवी मुंबईकरांवर अघोषित पाणीकपात करण्याची पाळी प्रशासनावर आली आहे. याचा परिणाम म्हणून शहरवासीयांची एकच तारांबळ उडत आहे. अनेक ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. कोपरखैरणे विभागात तर पाण्याच्या टँकरलाही वेटिंग असल्याचे दिसून आले आहे. यावर्षी पाऊस कमी पडल्याने राज्यात भीषण दुष्काळ पसरला आहे. बड्या शहरांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची पातळी खालावल्याने मुंबईसह राज्यातील बहुतांशी शहरांत पाणीकपात लागू करण्यात आली आहे. नवी मुंबईत मात्र आतापर्यंत कोणत्याही प्रकारची पाणीकपात करण्यात आलेली नाही. मोरबे धरणात सध्या अत्यंत कमी पाणीसाठा आहे. धरणात साधारण पुढील तीन ते चार महिने पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे. असे असतानाही पाण्याची उधळपट्टी सुरूच आहे. परंतु पुढील पावसाळ्यापर्यंतचे नियोजन म्हणून पाणीकपात करणे अपरिहार्य झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या काही दिवसांपासून छुप्या पद्धतीने पाणीकपात करण्यात आली आहे. याचा परिणाम म्हणून अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. तर काही विभागात पाणीपुरवठ्याचे तास कमी करण्यात आले आहे.विशेष म्हणजे यासंदर्भात कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न दिल्याने या अघोषित पाणीकपातीमुळे रहिवाशांची तारांबळ उडत आहे.कोपरखैरणे विभागात शुक्रवारपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे, तर काही सेक्टर्समध्ये दोन दिवसांपासून पाणीच आलेले नाही. त्यामुळे रहिवाशांना टँकरद्वारे पाणी घ्यावे लागत आहे. सोमवारी पाण्याच्या टँकरसाठीही रहिवाशांना ताटकळत बसावे लागले. दरम्यान, विभागस्तरावर पाणीवाटपाचे नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पुढील दोन-तीन दिवसांत पाणीकपातीचे धोरण निश्चित केले जाईल, अशी माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे यांनी दिली. (प्रतिनिधी)