शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

नेरूळमधील रिक्षा स्टँडमध्ये अनधिकृत वाहनतळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 04:25 IST

नेरूळ रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूला सिडकोने वाहनतळासाठी चार भूखंड उपलब्ध करून दिले आहेत. यानंतरही वाहन चालक रिक्षा स्टँडमध्ये व सर्व्हिस रोडवरही वाहने उभी करत आहेत.

नवी मुंबई - नेरूळ रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूला सिडकोने वाहनतळासाठी चार भूखंड उपलब्ध करून दिले आहेत. यानंतरही वाहन चालक रिक्षा स्टँडमध्ये व सर्व्हिस रोडवरही वाहने उभी करत आहेत. रिक्षा संघटनांनी याविषयी आवाज उठविल्यानंतर सिडको व वाहतूक पोलीस गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे याठिकाणी वारंवार वाहतूककोंडी होत आहे.नवी मुंबईमधील शिस्तबद्ध रिक्षा स्टँडमध्ये नेरूळ रेल्वे स्टेशनच्या स्टँडचाही समावेश होतो. रिक्षा चालक रांगेचा नियम पाळत आहेत. नेरूळ विभाग रिक्षा चालक मालक कल्याणकारी संस्थेने रोज दोन स्वयंसेवक नेमून रिक्षा वाहतूक सुरळीत होईल याकडे लक्ष देण्यास सुरवात केली आहे. परंतु स्टँडमधील अनधिकृत पार्किंगमुळे रिक्षा चालकांना त्रास होवू लागला आहे. सिडकोने पश्चिम बाजूला वाहने उभी करण्यासाठी चार भूखंड राखीव ठेवले असून तेथे पे अँड पार्क सुरू केले आहेत. परंतु अनेक मोटारसायकल व कार चालक वाहनतळावर पैसे द्यावे लागत असल्यामुळे रिक्षा स्टँडमध्ये व सर्व्हिस रोडवरच वाहने उभी करू लागले आहेत. रिक्षा स्टँडमध्ये १०० पेक्षा जास्त मोटारसायकल उभ्या केल्या जावू लागल्या आहेत. यामुळे करावेकडे जाणाऱ्या रिक्षा चालकांना नाईलाजाने बसस्टॉपजवळ सर्व्हिस रोडवर स्टँड सुरू करावा लागला आहे.पार्किंगच्या समस्येविषयी रिक्षा चालकांनी वारंवार सिडको प्रशासनाकडे व वाहतूक पोलिसांकडे पाठपुरावा केला आहे. रेल्वे स्टेशन परिसर सीवूड वाहतूक विभागाच्या अखत्यारीत येत आहे. परंतु त्यांच्याकडे टोइंग व्हॅनच नाही. यामुळे तुर्भे वाहतूक पोलिसांच्या टोइंग व्हॅनच्या सहाय्याने रोडवर वाहने उभी करणाºयांवर कारवाई केली जात आहे. परंतुही कारवाई अत्यंत त्रोटक स्वरूपाची आहे.नेरूळ रेल्वे स्टेशनसमोर रिक्षा स्टँडमध्ये व सर्व्हिस रोडवर अनधिकृतपणे वाहने उभी केली जात आहेत. यामुळे रिक्षा वाहतुकीला अडथळा निर्माण होवू लागला आहे. येथील अनधिकृत पार्किंग बंद केले तर वाहतुकीची समस्या कायमस्वरूपी सुटेल.- पद्माकर मेहेर,अध्यक्ष, रिक्षा संघटनारेल्वे स्टेशनसमोर सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. अधिकृत पे अँड पार्कची सुविधा असताना मोटारसायकल व कार चालक रोडवर वाहने उभी करत असून त्यांना चाप बसला पाहिजे.- दत्तात्रेय फडतरे,सचिव, रिक्षा संघटनाशासनाने परमीट खुले केल्यामुळे रिक्षांची संख्या वाढली आहे. स्टेशनसमोरील रिक्षा वाहतूक शिस्तबद्ध असावी यासाठी आम्ही नेरूळ विभाग रिक्षा चालक मालक कल्याणकारी संस्थेच्यावतीने प्रयत्न करत आहोत. प्रशासनाने अनधिकृत पार्किंग हटवून आम्हाला सहकार्य करावे.- निवृत्ती म्हात्रे,खजिनदार, रिक्षा संघटना

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई