आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी देखाव्यातून मांडले प्रश्न

By Admin | Updated: September 23, 2015 04:17 IST2015-09-23T04:17:05+5:302015-09-23T04:17:05+5:30

सगळीकडे गणेशोत्सवाचे प्रसन्न वातावरण आहे. अनेक जण विविध पद्धतीने गणेशोत्सव साजरा करीत असतात. काही जण संस्कृतीचे दर्शन घडविणारे देखावे

The tribal students hosted the show from the show | आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी देखाव्यातून मांडले प्रश्न

आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी देखाव्यातून मांडले प्रश्न

वैभव गायकर, पनवेल
सगळीकडे गणेशोत्सवाचे प्रसन्न वातावरण आहे. अनेक जण विविध पद्धतीने गणेशोत्सव साजरा करीत असतात. काही जण संस्कृतीचे दर्शन घडविणारे देखावे उभारत असतात तर काही इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत करीत असतात. मात्र खांदा कॉलनीतील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सात दिवसाच्या बाप्पाची स्थापना करून अनोखा देखावा साकारला आहे. मागील सहा महिन्यापासून आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या सुटाव्यात यासाठी विद्यार्थी आंदोलन करीत आहेत. प्रलंबित प्रश्न देखाव्याच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांनी मांडले आहेत. विविध मागण्यांचे फलक त्याठिकाणी लावून बाप्पां तुम्हीच आम्हाला न्याय द्या ही विनंती केली आहे.
मागील सहा महिन्यापासून आपल्या हक्काची लढाई हे विद्यार्थी लढत आहेत. पनवेल तालुक्यातील कोलवडी येथे भाड्याच्या जागेत सुरु असलेल्या आदिवासी वसतिगृह सुविधांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांनी सोडलं होतं. तेंव्हापासून सुरु झालेली ही लढाई आजतागायत सुरु आहे. आपल्या विविध मागण्याकरिता विद्यार्थ्यांनी उपोषण, मोर्चे, मंत्र्याच्या भेटी, अधिका-यांच्या भेटी हे सर्वच मार्ग अवलंबले मात्र यश आले नाही. उलट पेण येथे काढलेल्या मोर्च्यामुळे ३०९ विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. सर्वच मार्ग अवलबल्यनंतर शेवटी बप्पांना या विद्यार्थ्यांनी साकडे घातले आहे.
यावेळी देखाव्यात लावेलल्या फलकांमध्ये विविध मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये वासतिगृहातील विद्यार्थ्यांना न्याय मिळू द्या, सर्व गरजू विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळू दे, सर्वांना शैक्षणीक साहित्य पुस्तके, वह््या परीक्षा होण्या आगोदरच आभ्यासासाठी मिळू दे तसेच भ्रष्ट अधिका-यांना भ्रष्टाचारातून मुक्त कर आशाप्रकारच्या विनवण्या बाप्पांना या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. याशिवाय आदिवासीचे जीवन, राहणीमान याचा देखील जिवंत देखावा याठिकाणी उभारण्यात आला आहे. याच देखाव्यात महिला शक्तीचा जागर करण्यात आला आहे.

Web Title: The tribal students hosted the show from the show