शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी आदिवासींचा हल्लाबोल

By admin | Updated: March 21, 2017 02:16 IST

तापमानात वाढ झाल्याने उन्हाच्या झळा सर्वांनाच बसू लागल्या आहेत. पनवेल तालुक्यात पाणीटंचाई जाणवू लागली असून आदिवासी वाड्यांना याची अधिक झळ बसत आहे.

मयूर तांबडे / पनवेलतापमानात वाढ झाल्याने उन्हाच्या झळा सर्वांनाच बसू लागल्या आहेत. पनवेल तालुक्यात पाणीटंचाई जाणवू लागली असून आदिवासी वाड्यांना याची अधिक झळ बसत आहे.तालुक्यातील नांदगाव येथील जवळपास ५०० लोकसंख्या असलेल्या आदिवासी वाडीला पाण्यावाचून वंचित राहावे लागत असल्याने त्यांनी सोमवारी पंचायत समितीवर मोर्चा काढला होता. त्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गावात असलेल्या विहिरींची पातळी खाली गेल्याने आदिवासी वाडीत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दरवर्षी उद्भवणाऱ्या या परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यास प्रशासनाला अद्यापही यश आले नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. मार्च महिन्यातच पनवेल तालुक्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असून महिलांना, लहान मुलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. डोंगर कपाऱ्यात वसलेल्या गाव-पाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे. नांदगाव येथील खालची व वरची आदिवासी वाडीतील नागरिकांना दूरवरून पाणी आणावे लागत असल्याने ‘खायला नको पण पाणी द्या’ अशी अवस्था झाली आहे. मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या आदिवासी बांधवांना आता मजुरीबरोबरच पाण्यासाठीही भटकावे लागत आहे. पाणी नसल्यामुळे मजुरीवरही याचा परिणाम होत आहे. पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या असल्याने परिसरातील पशू-पक्षीही पाण्याच्या शोधात फिरताना दिसत आहेत. पाण्याची पातळी खालावल्याने परिसरातील विहिरीचे पाणी आटले आहे. तालुक्यातील पाणी समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी समन्वयाने नियोजन करून दुर्गम पाडे, वस्त्यांना पाणी कसे देता येईल याचे नियोजन करावे, त्यासाठी आर्थिक तरतूद करावी. नद्यांचे, ओहळाचे पाणी अडवणे, विहिरी, तलाव खोदणे, मोठ्या प्रमाणात बंधारे बांधून पाणी जिरवणे अशा स्वरूपाच्या योजना लक्षात घेऊन त्या राबवण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. मोरबे धरणामध्ये पुरेसा जलसाठा असला तरी नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती सुरू केली आहे. उन्हाळा सुरू झाल्याने राज्यातील अनेक गावे व शहरांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली आहे. मोरबे धरणामध्ये पुरेसा जलसाठा असल्याने नवी मुंबईकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही. पण यानंतरही नागरिकांनी भविष्यात पाणी समस्येला सामोरे जावे लागू नये यासाठी आतापासून पाणीबचत करण्यास सुरवात करावी. पाइपचा वापर करून वाहने धुवू नये. पाण्याचा कुठेही गैरवापर होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. जलबचतीचे महत्त्व लक्षात घेवून नैसर्गिक जलप्रवाह, जलाशय, कालवे व पाणीपुरवठ्याच्या पायाभूत सुविधांचे रक्षण करून पाण्याविषयी कायदे व नियमांचे काटेकोर पालन केले जावे. पाणीपुरवठ्याविषयी काहीही तक्रारी असल्यास संकेतस्थळावर व टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे व महापौर सुधाकर सोनावणे यांनी केले आहे.