शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत ‘चेक वटाव’ पद्धती बंद

By admin | Updated: November 18, 2016 02:49 IST

सरकारने नोटाबंदी केल्यानंतर शहरात सावकारी व्यवसायाआड सुरू असलेले ‘चेक वटाव’चे व्यवसाय बंद झाले आहेत.

भिवंडी : सरकारने नोटाबंदी केल्यानंतर शहरात सावकारी व्यवसायाआड सुरू असलेले ‘चेक वटाव’चे व्यवसाय बंद झाले आहेत. त्यामुळे यंत्रमाग कारखानदार अडचणीत आले आहेत.कापड उत्पादन व विक्री व्यवसायात अधिकाधिक व्यवहार रोखीने होतात. यासाठी बँक व्यवस्थापकांना हाताशी धरून स्थानिक यंत्रमाग कारखानदार व कापड व्यापारी विविध बँकांत बचत किंवा चालू खाते उघडून ते वर्षाच्या आत बंद केले जात होते. अशा खात्यामधून क्रॉस चेक वटवण्याचा व्यवसाय शहरातील अनेक सावकार वर्षानुवर्षे करीत होते. या सावकारांकडून रोखीने रक्कम घेत कारखाना मालक व चालक कामगारांचा पगार व इतर व्यवहार करीत होते. त्यापैकी बऱ्याच परप्रांतीय कारखानामालकांनी रोखीने आपल्या गावाला अन्य मालमत्ता खरेदी केली. परंतु, ५००, १००० हजाराच्या नोटा चलनातून बाद झाल्याने शहरातील सावकारांचे रोखीचे व्यवहार आता बंद झाले आहेत. मात्र, या महिन्याचे पगार कारखानामालकांनी रोखीने केल्याने कामगारांना आपली कामे सोडून बँकेच्या रांगेत उभे राहावे लागत आहे. काही ठिकाणी रांगेतील शिस्त बिघडून धक्काबुक्कीचे प्रकार झाले. त्यामुळे गर्दीला आवर घालण्यासाठी व चेंगराचेंगरी होऊ नये, म्हणून कोटरगेट जकातनाका येथील स्टेट बँक व कल्याण रोड, लाहोटी कम्पाउंड येथील पंजाब नॅशनल बँक, अ‍ॅक्सिस बँक येथे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. (प्रतिनिधी)