शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

वाशीत वसाहतीअंतर्गत वाहतूककोंडी

By admin | Updated: November 12, 2015 01:36 IST

वसाहतीअंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला होणाऱ्या वाहनांच्या पार्किंगमुळे ही परिस्थिती ओढावल्याचे दिसून आले आहे.

नवी मुंबई : वसाहतीअंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला होणाऱ्या वाहनांच्या पार्किंगमुळे ही परिस्थिती ओढावल्याचे दिसून आले आहे. रविवारी वाशी विभागातील बहुतांशी अंतर्गत रस्त्यांवर वाहनांचा चक्का जाम झाल्याचे पाहावयास मिळाले. दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागला. नियोजनबद्ध शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत पार्किंगचे नियोजन पूर्णत: फसले आहे. त्यामुळे जागा मिळेल तेथे वाहने पार्क केली जातात. याचा फटका वाहतूक व्यवस्थेला बसल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. पार्किंगच्या सुविधा नसल्याने बहुतांशी रस्त्यांच्या दुतर्फा वाहने पार्क केली जात आहेत. विशेषत: वसाहतीअंतर्गत रस्त्यांना तर पार्किंगचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला वाहनधारक आपल्या गाड्या पार्क करीत असल्याने याचा फटका वाहतूक यंत्रणेला बसला आहे. बेकायदा वाहन पार्किंगमुळे या रस्त्यांवरून स्कूल बस, रुग्णवाहिका, रिक्षा आदी वाहनांना मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. काही भागात तर दुचाकींचीही कोंडी होताना दिसत आहे. वाशी सेक्टर ९, १०, सेक्टर १५ व १६ या वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांवर नेहमीच वाहतूक कोंडी होते. रविवारी अशाचप्रकारे वाहतुकीचा खोळंबा झाल्याने या परिसरातील संपूर्ण रस्त्यांवर चक्का जाम झाल्याचे दिसून आले. वाशीप्रमाणेच कोपरखैरणे परिसरातील सेक्टर १९ आणि माथाडी वसाहतीतील रस्त्यांवर सुध्दा दोन्ही बाजूने वाहने उभी केली जातात. त्यामुळे अगोदरच अरुंद असलेले हे रस्ते दळणवळणाच्या दृष्टीने कुचकामी ठरले आहेत. शहरातील ऐरोली, घणसोली, सानपाडा, नेरूळ व सीबीडी या परिसरातील अशीच परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहावयास मिळते.त्यामुळे रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली असून रस्त्यावरील बेकायदा वाहन पार्किंगला आळा घालण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)