माथाडी कामगार मेळाव्याची परंपरा ३८ वर्षांनंतर खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 11:41 PM2020-09-24T23:41:49+5:302020-09-24T23:42:01+5:30

कोरोनामुळे ऑनलाइन समारंभ : माथाडी भवनमध्ये निवडक पदाधिकारी राहणार उपस्थित

tradition of Mathadi Kamgar Melava is broken after 38 years | माथाडी कामगार मेळाव्याची परंपरा ३८ वर्षांनंतर खंडित

माथाडी कामगार मेळाव्याची परंपरा ३८ वर्षांनंतर खंडित

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित होणाऱ्या कामगार मेळाव्याची परंपरा ३८ वर्षांनंतर खंडित होणार आहे. कोरोनामुळे जाहीर मेळाव्याऐवजी माथाडी भवनमध्ये निवडक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम होणार आहे. या वेळी ‘माथाडी भूषण’ पुरस्काराचेही वितरण करण्यात येणार आहे.

 
महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २५ सप्टेंबरला एपीएमसीमध्ये माथाडी कामगार मेळाव्याचे आयोजन केले जाते. या मेळाव्यामध्ये प्रत्येक वर्षी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर ज्येष्ठ नेते उपस्थित राहत असतात. माथाडी कामगारांचे प्रश्न व चळवळीवर चर्चा या मेळाव्यात होत असते. अनेक प्रश्नांना या मेळाव्यातून वाचा फोडली जाते व ते शासनाकडून सोडवून घेतले जातात. राज्यातून १० हजारपेक्षा जास्त कामगार या मेळाव्याला उपस्थित राहत असतात. राजकीयदृष्ट्याही या मेळाव्याला विशेष महत्त्व असते. अनेक आमदार, मंत्री व लोकप्रतिनिधी मेळाव्यास आवर्जून उपस्थित असतात. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, मुुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील अनेक लोकसभा व विधानसभा मतदारसंघांत माथाडी कामगारांची मते निर्णायक ठरत असल्यामुळेही लोकप्रतिनिधी कामगारांशी स्नेह वृद्धिंगत करण्यासाठी मेळाव्यास येत असतात.


या वर्षी कोरोनामुळे ३८ वर्षांमध्ये पहिल्यांदाच माथाडी कामगारांचा मेळावा रद्द करण्यात आला आहे. कांदा - बटाटा मार्केटमधील जाहीर मेळाव्याऐवजी माथाडी भवनमध्ये कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. या मेळाव्यास राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र पाटील, कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कामगारांना हा कार्यक्रम आॅनलाइन पाहता येणार आहे. प्रत्येक वर्षी दिला जाणारा ‘माथाडी भूषण’ पुरस्काराचेही या वेळी वितरण करण्यात येणार आहे.

अनेक प्रश्नांना वाचा फोडली जाते व ते शासनाकडून सोडवून घेतले जातात.
माथाडी कामगारांचे प्रश्न व चळवळीवर चर्चा या मेळाव्यात होत असते.

Web Title: tradition of Mathadi Kamgar Melava is broken after 38 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.