शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
4
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
5
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
6
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
7
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
8
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
9
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
10
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
11
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
12
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
13
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
14
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
15
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
16
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
17
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
18
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
19
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
20
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

भाजी मार्केटमध्ये व्यापाऱ्याची गुंडगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 03:39 IST

भाजी मार्केटमध्ये अवैधपणे कांदा-बटाट्याचा व्यापार करणाऱ्या सागर बारवे या व्यापाऱ्याने सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार गुरुवारी घडला.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : भाजी मार्केटमध्ये अवैधपणे कांदा-बटाट्याचा व्यापार करणाऱ्या सागर बारवे या व्यापाऱ्याने सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार गुरुवारी घडला. सुरक्षा अधिकाऱ्यांना व एपीएमसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चोर असल्याचे संबोधत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आहे. याप्रकरणी सुरक्षारक्षकांनी पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दिली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटच्या गेटवर व मार्केटमध्येही अनधिकृतपणे कांदा-बटाट्याची विक्री केली जात आहे. व्यापार करणारे सुरक्षारक्षकांना व बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी करून बिनधास्तपणे व्यापार करत आहेत. प्रवेशद्वाराच्या बाहेरील मुख्य रस्ताही अडविला जात असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होऊ लागली आहे. यापूर्वी राजेंद्र बारवे या व्यापाऱ्याने सुरक्षारक्षकांना शिवीगाळ केल्याची घटना घडली होती. प्रत्येक वेळी सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना माहिती दिली आहे. काही वेळा एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारीही दिल्या आहेत; परंतु शासकीय कामात अडथळा आणून कर्मचाऱ्यांना धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्याऐवजी पोलिसांनीही प्रत्येक वेळी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. बाजार समितीचे अध्यक्ष, सचिव व मुख्य सुरक्षा अधिकारीही कधीच सुरक्षारक्षकांच्या पाठीशी उभे राहात नाहीत. गुरुवारी पहाटे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बारवे यांच्या गाडीवर कारवाई केली होती. या कारवाईचा राग येऊन राजेंद्र बारवे यांचा मुलगा सागर बारवे घटनास्थळी येऊन त्याने सुरक्षा कर्मचारी भीमराव पाटील यांना व इतरांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. अत्यंत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून कारवाई काय केली, असा जाब विचारला. मार्केटमध्ये चोरी करणाऱ्यांना तुमचे अधिकारी काही करत नाहीत. अधिकारी चोर आहेत. आम्हाला काय शिकविता. तुम्हाला सर्वांना बघून घेतो, अशा प्रकारची धमकी देऊन या प्रकाराचे चित्रीकरण करणाऱ्यांच्या अंगावर मारण्यासाठी धावून गेला. या प्रकाराविषयी पाटील यांनी एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदविली आहे. सागर बारवे शिवीगाळ करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्यामुळे कर्मचारी संघटनांनीही आक्रमक भूमिका घेतली असून व्यापाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे. सुरक्षारक्षकांना वाली नाहीएपीएमसीमधील सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांना काम करण्याचे स्वातंत्र्य दिले जात नाही. त्यांच्या कामामध्ये वारंवार हस्तक्षेप केला जात आहे. अध्यक्ष, सचिव व मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांकडून सुरक्षा विभागाचे मनोबल वाढविण्यासाठी काहीही केले जात नाही. कोणी तक्रार केली की सुरक्षारक्षकांना बोर्डात पाठविण्याचा इशारा दिला जात असून त्यांना धमकावणाऱ्यांवर मात्र कडक कारवाई केली जात नसल्याने कर्मचारी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.