थंडीने मारली दडी, स्वेटर विक्रेत्यांना हुडहुडी
By Admin | Updated: November 10, 2014 22:24 IST2014-11-10T22:24:03+5:302014-11-10T22:24:03+5:30
सीमावर्ती राज्यातून ऊबदार कपडे विक्रीसाठी मुंबई ठाण्यात ठाण मांडणा:या स्वेटर विक्रेत्यांना चांगलीच हुडहुडी भरली आहे.

थंडीने मारली दडी, स्वेटर विक्रेत्यांना हुडहुडी
ठाणो : दिवाळी सोबत आगमन करणा:या थंडीने आता नोव्हेंबरचा पहिला आठवडा झाला तरी पुरेसे आगमन न केल्याने सीमावर्ती राज्यातून ऊबदार कपडे विक्रीसाठी मुंबई ठाण्यात ठाण मांडणा:या स्वेटर विक्रेत्यांना चांगलीच हुडहुडी भरली आहे. हवामान खाते सांगते आहे की, अजून जोरदार पडण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी लागू शकतो. मध्यंतरी निर्माण झालेल्या वादळामुळे हे बदल वातावरणात झाले आहे. परंतु त्यांचा फटका मात्र या विक्रेत्यांना बसतो आहे.
जे मुंबई ठाण्यात घडते आहे तेच रायगड नाशिक, औरंगाबाद, पुणो या जिल्हय़ातील घडत असल्याने या विक्रेत्यांना त्याचा परिणाम भोगावा लागतो आहे. एक दुकान चालविण्यासाठी घरातील चार व्यक्ती आणि धंदा वाढला तर स्थानिक दोन रोजंदारीवरील विक्रेते आणि रोजचा धंदा किमान दहा ते बारा हजार झाला तरच ही विक्री त्यांना परवडते. चार जणांचा रोजचा खर्च हजार ते पंधराशे असतो त्यात अडीचशे ते तीनशे रुपये स्थानिक विक्रेत्याचा रोज शिवाय जागेचे भाडे वेगळे अशी अवस्था असते. धंदा तेजीत असेल तर बाहेरचेच अन्न खावे लागते. त्यामध्ये राईस प्लेट 1क्क् रु. आणि वडापाव किंवा तत्सम पदार्थाचा नाश्ता चहासोबत म्हटला तरी ते 1क्क् रु. होतात. म्हणजे 3क्क् रु. रोज एका व्यक्तीचा होतो. तो परवडू न लागल्याने या मंडळींनी आता काही जणांनी ग्रुप करून त्यांचे जेवण नाश्ता एकत्र बनवून कम्युनिटी किचनचा मार्ग अनुसरला आहे. यामुळे जेवणाखाण्यावरील खर्चात निम्म्याने कपात करणो त्यांना शक्य झाले आहे.
मालाची विक्री नसल्याने साठवून ठेवलेल्या मालाचे करायचे काय? हा प्रश्न त्यांच्या पुढे उभा आहे. तसेच इथल्या कमाईतूनच ते गावाकडे पैसे पाठवतात. ते पाठवणो राहिले दूरच उलट त्यांनाच गावाकडून पैसे मागवावे लागण्याची वेळ ओढावली आहे. आमच्या आयुष्यात आम्ही इतका खराब सिझन कधी पाहिला नाही असे त्यांच्या प्रतिनिधीने म्हटले आहे. यावर इलाज म्हणून आता जीन्स आणि तत्सम कपडे विक्रीला ठेवण्याचा मार्ग अनुसरावा की काय? असा विचार ते करीत आहेत. यामुळे किमान रोलिंग तरी चालू राहील आणि थोडाफार खर्च भरून निघेल असा विचार ते करीत आहेत. जर नोव्हेंबरही असाच कोरडा गेला तर उरतो फक्त डिसेंबर त्यातही थंडी पुरेशी तीव्र नसेल तर संक्रांतीनंतर हिवाळा संपतोच त्यामुळे हा सगळा सिझन चिल्लर बिझीनेसवरच गेला, अशी त्यांची हालत होणार आहे. (विशेष प्रतिनिधी)