शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
3
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
4
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
5
NCB आणि ATS ची मोठी कारवाई; 90 KG ड्रग्ससह 14 पाकिस्तानी नागरिकांना अटक
6
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
7
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
9
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
10
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
11
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
12
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
13
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
14
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
15
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
16
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
17
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
18
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
19
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
20
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली

पनवेलमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे तीनतेरा, नालेसफाईची पोलखोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 11:27 PM

संततधारेमुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली असून पुन्हा एकदा नालेसफाईची पोलखोल झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

- वैभव गायकरपनवेल : पनवेल परिसरात मागील तीन दिवसांपासून बरसलेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत केले आहे. संततधारेमुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली असून पुन्हा एकदा नालेसफाईची पोलखोल झाल्याचे पाहावयास मिळत आहे.सोमवारी पावसाचा जोर कायम होता. विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यात सर्वात जास्त सरासरी पावसाची नोंद पनवेल तालुक्यात झाली आहे. तालुक्यात सोमवारी २०७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. रायगड जिल्ह्यातील १६ तालुक्यापैकी पनवेल तालुक्यात सर्वात जास्त पर्जन्यमान झाले. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. पालिका क्षेत्रातील ग्रामीण भागात मोठ्या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. पालिका क्षेत्रातील सिद्धी करवले गावात वीजपुरवठा मागील दोन दिवसापासून खंडित झाला आहे. महावितरणने बसविलेले विद्युत खांब अतिवृष्टीमुळे कोसळल्याने ग्रामस्थांना दोन दिवस अंधारात घालवावे लागले. पनवेल शहरातील एचओसी आदिवासी वाडीत देखील मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शिरले होते. १५ ते २० घरांची लोकवस्ती असलेल्या या आदिवासी वाडीत साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी केवळ एकच पंप याठिकाणी कार्यान्वित होता. पनवेल तालुका क्रीडा संकुलाच्या समोरच ही आदिवासी वाडी आहे. या परिसरात करण्यात आलेल्या भरावामुळे ही परिस्थिती उद्भवली होती. पनवेल महानगर पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र मुख्यालयाजवळील अग्निशमन केंद्रात स्थापन करण्यात आलेले आहे. मात्र सक्षम असे आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारण्यास पालिकेला अपयश आल्याचे पहावयास मिळाले आहे. पालिकेच्या मालकीची बोट नसल्याने आपत्कालीन परिस्थितीवर नवी मुंबई महानगरपालिकेकडे किंवा सिडकोची मदत पालिकेला घ्यावी लागणार आहे. सध्याच्या घडीला पालिकेच्या मार्फत प्रभागनिहाय आपत्कालीन केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे. मात्र या केंद्रांमध्ये आवश्यक सामुग्री उपलब्ध नसल्याने कर्मचाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापनाची धुरा आहे. खारघर, कळंबोली, कामोठे, नावडे आदी ठिकाणी प्रभागनिहाय आपत्ती व्यवस्थापन केंद्र स्थापन करण्यात आलेले आहेत. तर मुख्य केंद्र पनवेल अग्निशमन केंद्रात स्थापन करण्यात आलेले आहेत. सध्याच्या घडीला पनवेल महानगर पालिकेत नोकरभरती झाली नसल्याने अपुरा मनुष्यबळाचा फटका पालिका कर्मचाऱ्यांवर पडत आहे. विविध विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाºयांवरच आपत्ती व्यवस्थापनाचा भार आहे.प्रभागनिहाय पालिकेची आपत्ती व्यवस्थापन केंद्रेखारघर, कळंबोली, कामोठे, नावडे आदींसह पनवेल अग्निशमन केंद्रात मुख्य आपत्ती व्यवस्थापन केंद्रे कार्यान्वित आहे. याकरिता ०२२२७४५८०४० /४१/४२ या क्रमांकाची हेल्पलाइन पालिकेने सुरु केली आहे.तहसील कार्यालयाचे इतर प्राधिकरणाशी समन्वयपनवेल महानगर पालिका क्षेत्र वगळता पनवेल तहसील कार्यालयामार्फत देखील आपत्ती व्यवस्थापन करण्यात येत आहे.तहसीलदार अमित सानप हे याकरिता स्वत: इतर प्राधिकरणाशी समन्वय साधून आपत्कालीन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.आवश्यकता भासल्यास सिडको, महानगर पालिका, एमआयडीसी आदी प्राधिकरणाची मदत घेत असल्याचे तहसीलदार सानप यांनी सांगितले.

टॅग्स :panvelपनवेल