शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्हाधिकारी हाजीर होऽऽ

By admin | Updated: December 22, 2016 06:03 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या घनकचरा प्रकल्प स्थलांतराचा तिढा राष्ट्रीय हरित लवादाकडे प्रलंबित आहे. १९ डिसेंबरला

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या घनकचरा प्रकल्प स्थलांतराचा तिढा राष्ट्रीय हरित लवादाकडे प्रलंबित आहे. १९ डिसेंबरला पार पडलेल्या सुनावणीत लवादाच्या न्या. देशपांडे व न्या. रहिम खंडपीठाने थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच पुढील सुनावणीस हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.पालिकेने २००८ मध्ये उत्तनच्या धावगी-डोंगरी येथे बीओटी तत्त्वावर घनकचरा प्रकल्प सुरू केला होता. त्याला स्थानिकांनी तीव्र विरोध केल्यानंतरही तो सुरू झाल्याने आरोग्याच्या समस्येचा दावा उपस्थित करून स्थानिकांनी त्याच्या स्थलांतरासाठी पालिकेकडे सतत पाठपुरावा सुरू केला होता. सुरुवातीला तो घोडबंदर येथील वरसावे गावात स्थलांतर करण्याचा ठराव तत्कालीन महासभेत मंजूर करण्यात आला. तेथील ग्रामस्थांनीही त्याला जोरदार विरोध केल्यानंतर तो वसई तालुक्यातील सकवार येथे स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, प्रकल्पासाठी जागा मिळावी, यासाठी पालिकेने राज्य सरकारसह जिल्हा प्रशासनाकडे पत्रव्यवहार सुरू केला. त्याला अखेर यश आल्याने सरकारने जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी सकवार येथे सुमारे ७० एकर जागा दिली. त्यापोटी पालिकेने ७२ लाख रु. जिल्हा प्रशासनाला अदा केले. परंतु, त्याचा सातबारा अद्याप पालिकेच्या नावे केलेला नाही. त्यातच, ही जागा वनविभागात येत असल्याने प्रकल्पासाठी अद्याप परवानगी मिळालेली नाही. या प्रकल्पात पालिकेला बीओटी तत्त्वावरील कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प सुरू करायचा असल्याने अद्याप त्याला ठोस प्रतिसाद मिळालेला नाही. या दुहेरी अडचणीत सापडलेल्या पालिकेचा प्रकल्प सकवारमध्ये होऊ न देण्यासाठी सकवार ग्रामस्थांनीसुद्धा पंचायत सभेत ठराव मंजूर करून तो जिल्हा प्रशासनाकडे धाडला. यामुळे सकवारचा प्रकल्पसुद्धा सध्या अनिश्चितीच्या सावटाखाली असल्याने स्थानिकांनी प्रकल्प स्थलांतरासाठी नागरी हक्क संघर्ष समितीच्या माध्यमातून २०१५ मध्ये थेट राष्ट्रीय हरित लवादाच्या पश्चिम खंडपीठाकडे याचिका दाखल केली. त्यावर, पार पडलेल्या सुनावणीत लवादाने पालिकेच्या अडचणींच्या दाव्यावर वेळोवेळी कडक ताशेरे ओढून सकवार प्रकल्पापोटी येणाऱ्या खर्चापैकी सुमारे ७० कोटी रक्कम एस्क्रो खात्यात जमा करण्याचे आदेश २७ नोव्हेंबर २०१५ रोजी दिले. त्यावर पालिकेने उच्च न्यायालयातून स्थगिती मिळवल्यानंतर न्यायालयाने लवादाकडेच पुढील सुनावणी सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर, पार पडलेल्या सुनावणीत ७० कोटी रक्कम भरण्याच्या आदेशावर लवादाने फेरविचार करण्याची पालिकेने विनंती केली. (प्रतिनिधी)