शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

अभय योजनेकडे शिक्षण संस्थांची पाठ

By admin | Updated: March 16, 2017 03:05 IST

नियम व अटींचे उल्लंघन करून शैक्षणिक प्रयोजनासाठी असलेल्या भूखंडांचा अन्य प्रयोजनासाठी वापर करणाऱ्या शैक्षणिक संस्थांसाठी सिडकोने सहा

नवी मुंबई : नियम व अटींचे उल्लंघन करून शैक्षणिक प्रयोजनासाठी असलेल्या भूखंडांचा अन्य प्रयोजनासाठी वापर करणाऱ्या शैक्षणिक संस्थांसाठी सिडकोने सहा महिन्यांपूर्वी अभय योजना सुरू केली होती. परंतु या योजनेला शैक्षणिक संस्थांकडून फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे सिडकोसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.नवी मुंबईची उभारणी करताना सिडकोने शैक्षणिक सुविधांच्या निर्मितीवर अग्रक्रमाने भर दिला. त्यानुसार विविध शैक्षणिक संस्थांना शाळा व महाविद्यालये सुरू करण्यासाठी सवलतीच्या दरात मोठ्या प्रमाणात भूखंड दिले आहेत. या भूखंडांचे वाटप करताना सिडकोने काही अटी व नियमांचे बंधन घातले होते. त्यानुसार अनेक संस्थांनी प्राथमिक शाळेसाठी असलेल्या भूखंडांचा उच्च शिक्षणासाठी वापर केला आहे, तर काहींनी उच्च शिक्षणासाठी असलेल्या भूखंडांचा वापर प्राथमिक शिक्षणासाठी केला आहे. भूखंडांच्या वापरात बदल करताना सिडकोची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे असा बदल करणे करारनाम्यातील नियम व अटींचे उल्लंघन असल्याने मध्यंतरी सिडकोने अशा शैक्षणिक संस्थांवर कारवाईचा बडगा उगारला होता. त्यामुळे संस्था चालकांचे धाबे दणाणले होते. असे असले तरी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अशा शैक्षणिक संस्थांसाठी सिडकोने सहा महिन्यांपूर्वी अभय योजना आणली होती. या योजनेमुळे भूखंडांच्या वापरात बदल केलेल्या शैक्षणिक संस्थांना अतिरिक्त अधिमूल्य व प्रशासकीय शुल्क भरून हा बदल नियमित करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. ज्या शैक्षणिक संस्थांनी करारनाम्यात नमूद केल्याप्रमाणे एकूण भूखंडापैकी किमान २५ टक्के क्षेत्र शैक्षणिक प्रयोजनासाठी वापरलेले असेल, अशाच संस्थांना संधी देण्यात आली होती. (प्रतिनिधी)