शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक बनला राजकारणी

By admin | Updated: July 8, 2017 05:54 IST

रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील शिक्षकांकडून शिक्षण क्षेत्राला बदनाम करणारे कृत्य गेली काही दिवस बेधडकपणे होत आहे. तालुक्यातील

मिलिंद अष्टिवकर/ लोकमत न्यूज नेटवर्करोहा : रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील शिक्षकांकडून शिक्षण क्षेत्राला बदनाम करणारे कृत्य गेली काही दिवस बेधडकपणे होत आहे. तालुक्यातील शाळांमध्ये राजकीय शिकवण देणाऱ्या ‘लोकनेते आमदार सुनील तटकरे सोनहिरा’ या विषयावर निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. ही बाब निदर्शनास येताच भाजपा प्रदेश का. सदस्य संजय कोणकर यांनी गटशिक्षणाधिकारी रोहा यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना याचा जाब विचारला. या सर्व प्रकाराबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे रीतसर तक्रार करण्यात आली आहे.शिक्षक म्हणजे ज्ञानाचे मूर्तिमंत स्वरूप. मात्र हाच शिक्षक जर बिघडला तर अख्खा समाज बिघडण्यास वेळ लागणार नाही. याचीच प्रचिती सध्या रोहा तालुक्याला येत आहे. येथील शिक्षकांना आपल्या कर्तव्याचा विसर पडून सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान नावाच्या राजकीय संघटनेबरोबर सहभागी होत उघडपणे शालेय विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनात राजकीय बीज पेरण्याचे राजकारण गेल्या पंधरवड्यापासून सुरू आहे. चित्रकला स्पर्धा घेणे योग्य असे होते त्यातून मुलांच्या कलागुणांना वाव मिळत असतो. मात्र ‘लोकनेते आमदार सुनील तटकरे सोनहिरा’ या विषयावर निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा केंद्र व तालुका स्तरावर घेतल्या, ही बाब शैक्षणिक क्षेत्राला बदनाम करणारी ठरली आहे. हा गैरप्रकार फक्त रोहा शहरातील शाळा व मेहेंदळे हायस्कूलमध्येच नाही तर संपूर्ण रोहे तालुक्यात घडला आहे. शुक्र वारी तालुकास्तरावरील स्पर्धा ज्येष्ठ नागरिक सभागृहात संपन्न झाल्या. यामध्ये विजेत्यांना रविवारी होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेच्या वेळी बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यासाठी काही केंद्र प्रमुखांनी खास सुनील तटकरे प्राथमिक व माध्यमिक शिक्षक प्रतिष्ठान असे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपही तयार के ले आहेत.या स्पर्धेची तयारी प्राथमिक शिक्षकांनी गेल्या पंधरा दिवसांपासून चालविलेली होती. मंगळवारपासून तर केंद्र स्तरावरील स्पर्धेसाठी सर्व शिक्षक शाळा सोडून, मुलांचे वर्ग सोडून स्पर्धांच्या नियोजनासाठी उपस्थिती लावत असल्याचेही समजले आहे. शिक्षकांकडून झालेले हे कृत्य अतिशय गैर आणि विद्यार्थ्यांमध्ये चुकीचे संदेश देणारे असल्याचे तालुक्यात बोलले जात आहे.याबाबत प्रत्यक्ष गटशिक्षण अधिकारी रोहा कार्यालयात जाऊन आम्ही त्यांना जाब विचारला आहे. चित्रकला स्पर्धा ठीक आहेत, त्यातून मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो. मात्र ‘लोकनेते आमदार सुनील तटकरे सोनहिरा’ असा विषय देऊन निबंध स्पर्धा घेणे, वक्तृत्व स्पर्धा घेणे ही शैक्षणिक क्षेत्राला काळिमा फासणारी बाब आहे, या गैरप्रकाराचा भाजपा निषेध करीत आहे. तसेच या गैर कृत्याबाबत सह केंद्र प्रमुख आणि शिक्षकांची तक्र ार शिक्षणमंत्री तावडे यांच्याकडे करण्यात आली असून याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी आहे.- संजय कोणकर, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य.माझ्याकडून कुठलेही असे कार्यक्र म घेण्याचे आदेश केंद्र प्रमुखांना दिले गेलेले नव्हते,माझा या घटनेशी काहीही संबंध नाही. शैक्षणिक क्षेत्रात राजकीय पक्षाचे अथवा राजकीय क्षेत्रात कार्यरत व्यक्तीच्या नावे विषय देऊन निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेणे योग्य नव्हे. याबाबत अधिक माहिती घेऊन मी चौकशी क रतो.- एस.एन. भांगारे, प्रभारी गटशिक्षण अधिकारी, रोहा.