शिक्षक बनला राजकारणी

By Admin | Updated: July 8, 2017 05:54 IST2017-07-08T05:54:28+5:302017-07-08T05:54:28+5:30

रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील शिक्षकांकडून शिक्षण क्षेत्राला बदनाम करणारे कृत्य गेली काही दिवस बेधडकपणे होत आहे. तालुक्यातील

The teacher became a politician | शिक्षक बनला राजकारणी

शिक्षक बनला राजकारणी

मिलिंद अष्टिवकर/ लोकमत न्यूज नेटवर्क
रोहा : रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील शिक्षकांकडून शिक्षण क्षेत्राला बदनाम करणारे कृत्य गेली काही दिवस बेधडकपणे होत आहे. तालुक्यातील शाळांमध्ये राजकीय शिकवण देणाऱ्या ‘लोकनेते आमदार सुनील तटकरे सोनहिरा’ या विषयावर निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. ही बाब निदर्शनास येताच भाजपा प्रदेश का. सदस्य संजय कोणकर यांनी गटशिक्षणाधिकारी रोहा यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना याचा जाब विचारला. या सर्व प्रकाराबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे रीतसर तक्रार करण्यात आली आहे.
शिक्षक म्हणजे ज्ञानाचे मूर्तिमंत स्वरूप. मात्र हाच शिक्षक जर बिघडला तर अख्खा समाज बिघडण्यास वेळ लागणार नाही. याचीच प्रचिती सध्या रोहा तालुक्याला येत आहे. येथील शिक्षकांना आपल्या कर्तव्याचा विसर पडून सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान नावाच्या राजकीय संघटनेबरोबर सहभागी होत उघडपणे शालेय विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनात राजकीय बीज पेरण्याचे राजकारण गेल्या पंधरवड्यापासून सुरू आहे. चित्रकला स्पर्धा घेणे योग्य असे होते त्यातून मुलांच्या कलागुणांना वाव मिळत असतो. मात्र ‘लोकनेते आमदार सुनील तटकरे सोनहिरा’ या विषयावर निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा केंद्र व तालुका स्तरावर घेतल्या, ही बाब शैक्षणिक क्षेत्राला बदनाम करणारी ठरली आहे. हा गैरप्रकार फक्त रोहा शहरातील शाळा व मेहेंदळे हायस्कूलमध्येच नाही तर संपूर्ण रोहे तालुक्यात घडला आहे. शुक्र वारी तालुकास्तरावरील स्पर्धा ज्येष्ठ नागरिक सभागृहात संपन्न झाल्या. यामध्ये विजेत्यांना रविवारी होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेच्या वेळी बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यासाठी काही केंद्र प्रमुखांनी खास सुनील तटकरे प्राथमिक व माध्यमिक शिक्षक प्रतिष्ठान असे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपही तयार के ले आहेत.
या स्पर्धेची तयारी प्राथमिक शिक्षकांनी गेल्या पंधरा दिवसांपासून चालविलेली होती. मंगळवारपासून तर केंद्र स्तरावरील स्पर्धेसाठी सर्व शिक्षक शाळा सोडून, मुलांचे वर्ग सोडून स्पर्धांच्या नियोजनासाठी उपस्थिती लावत असल्याचेही समजले आहे. शिक्षकांकडून झालेले हे कृत्य अतिशय गैर आणि विद्यार्थ्यांमध्ये चुकीचे संदेश देणारे असल्याचे तालुक्यात बोलले जात आहे.

याबाबत प्रत्यक्ष गटशिक्षण अधिकारी रोहा कार्यालयात जाऊन आम्ही त्यांना जाब विचारला आहे. चित्रकला स्पर्धा ठीक आहेत, त्यातून मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो. मात्र ‘लोकनेते आमदार सुनील तटकरे सोनहिरा’ असा विषय देऊन निबंध स्पर्धा घेणे, वक्तृत्व स्पर्धा घेणे ही शैक्षणिक क्षेत्राला काळिमा फासणारी बाब आहे, या गैरप्रकाराचा भाजपा निषेध करीत आहे. तसेच या गैर कृत्याबाबत सह केंद्र प्रमुख आणि शिक्षकांची तक्र ार शिक्षणमंत्री तावडे यांच्याकडे करण्यात आली असून याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी आहे.
- संजय कोणकर, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य.

माझ्याकडून कुठलेही असे कार्यक्र म घेण्याचे आदेश केंद्र प्रमुखांना दिले गेलेले नव्हते,माझा या घटनेशी काहीही संबंध नाही. शैक्षणिक क्षेत्रात राजकीय पक्षाचे अथवा राजकीय क्षेत्रात कार्यरत व्यक्तीच्या नावे विषय देऊन निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेणे योग्य नव्हे. याबाबत अधिक माहिती घेऊन मी चौकशी क रतो.
- एस.एन. भांगारे, प्रभारी गटशिक्षण अधिकारी, रोहा.

Web Title: The teacher became a politician