शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

विशेष महासभेत आरोग्य यंत्रणेचा होणार पंचनामा

By admin | Updated: September 14, 2015 04:13 IST

शहरात डेंग्यू, मलेरियाने थैमान घातले असून आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. शहरवासीयांना चांगली आरोग्यसेवा देण्यात पालिका प्रशासनास अपयश आले आहे

नामदेव मोरे, नवी मुंबईशहरात डेंग्यू, मलेरियाने थैमान घातले असून आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. शहरवासीयांना चांगली आरोग्यसेवा देण्यात पालिका प्रशासनास अपयश आले आहे. नागरिकांसह लोकप्रतिनिधींमध्ये असंतोष निर्माण झाला असून त्याचे पडसाद सोमवारी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत उमटणार आहेत. सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाचे नगरसेवक आरोग्य यंत्रणेचा पंचनामा करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाणीपुरवठा, नागरी स्वच्छता अभियान, अत्याधुनिक क्षेपणभूमी, सी - टेक धर्तीवर आधारित हायटेक मलनिस्सारण केंद्र व इतर अनेक गोष्टींसाठी महापालिकेला राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत. अल्पावधीमध्ये सर्वाधिक मानाचे पुरस्कार मिळविणारी महापालिका म्हणून नवी मुंबईची ओळख निर्माण झाली आहे. केंद्र शासनाने केलेल्या स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणामध्ये देशात तिसरा व राज्यात पहिला क्रमांकही नवी मुंबईस मिळाला आहे. एकीकडे स्वच्छ शहर अशी बिरुदावली मिरविण्यात येत असताना दुसरीकडे डेंग्यू, मलेरियाच्या साथीने थैमान घातले आहे. स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. झोपडपट्टीमधील हजारो नागरिकांना उघड्यावर शौचास जावे लागत आहे. महापालिकेच्या दिघा परिसरातील शाळेत विद्यार्थी व शिक्षकांसाठी एकही प्रसाधनगृह नाही. शहरातील नेरूळ व तुर्भे माताबाल रुग्णालये पूर्णपणे बंद आहेत. कोपरखैरणे माताबाल रुग्णालयाची वास्तू धोकादायक झाली आहे, ते रुग्णालय कोणत्याही क्षणी बंद केले जाणार आहे. ऐरोली माता बाल रुग्णालय फक्त नावापुरते सुरू आहे. फक्त वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू आहे. परंतु त्याची क्षमता फक्त ३०० बेडची आहे. १२ लाख लोकसंख्येसाठी फक्त एकच रुग्णालय असलेली नवी मुंबई एकमेव महापालिका आहे. प्रत्येक वर्षी आरोग्य सुविधा, घनकचरा व मलनिस्सारण विभागावर जवळपास २०० कोटी खर्च होतात एवढा प्रचंड खर्च करूनही आवश्यक सुविधा मिळत नाहीत. रुग्णालयांची पूर्ण यंत्रणाच कोलमडली आहे. अधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी सुरू आहे. पूर्वी मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या डॉ. संजय पत्तीवार यांच्या कामकाजाविषयी लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी व्यक्त झाल्यानंतर त्यांची त्या पदावरून उचलबांगडी करण्यात आली. त्यांना अतिरिक्त आयुक्तपदी बढती दिली परंतु अनेक वर्षे काहीच काम दिले नव्हते. त्यानंतर आलेल्या डॉ. दीपक परोपकारी यांच्याविरोधात एका गटाने आवाज उठवून त्यांची उचलबांगडी करण्यास भाग पाडले. त्यांच्या जागी आलेले डॉ. रमेश निकम यांनी आरोग्य यंत्रणेचा डोलारा सांभाळण्याचा प्रयत्न केला. परंतु नंतर त्यांनाही हटवून पुन्हा त्यांच्या जागेवर परोपकारी यांची नियुक्ती केली आहे. आरोग्य विभागाला सक्षम अधिकारीच न मिळाल्यामुळे पूर्ण आरोग्य व्यवस्थेचा खेळखंडोबा झाला आहे.