शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेशाच्या बहाण्याने गंडा

By admin | Updated: September 14, 2015 23:42 IST

मुंबई विद्यापीठात डी फार्मसीसाठी प्रवेश मिळवून देतो सांगून एकाची फसवणूक झाल्याची बाब उघड झाली आहे. याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात

नवी मुंबई : मुंबई विद्यापीठात डी फार्मसीसाठी प्रवेश मिळवून देतो सांगून एकाची फसवणूक झाल्याची बाब उघड झाली आहे. याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधिताने इतरही अनेकांना फसवल्याची शक्यता आहे.कामोठे येथे राहणाऱ्या कैलास नडगावकर यांनी फसवणुकीची तक्रार पोलिसांकडे केली आहे. त्यांच्या पत्नीला मुंबई विद्यापीठात डी फार्मसीसाठी प्रवेश हवा होता. एका जाहिरातीच्या माध्यमातून त्यांनी २०१३ साली शिवप्रसाद यादव याच्याशी संपर्क साधला आणि त्याने दिलेल्या बँक खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने एकूण ५० हजार रुपये जमा केले होते. परंतु पैसे घेतल्यानंतरही डी फार्मसीसाठी प्रवेश न मिळाल्याने दिलेली रक्कम परत मिळवण्यासाठी त्यांनी यादवला संपर्क केला असता त्याने टाळाटाळ केली. अखेर फसवणूक प्रकरणी नडगावकर यांनी यादवविरोधात कामोठे पोलिसांकडे तक्रार केली.नोकरीच्या आमिषाने एकाची फसवणूकदुबईत नोकरी लावण्याच्या बहाण्याने फसवणूक झाल्याचा प्रकार वाशी येथे घडला आहे. या प्रकारात तरुणाची १ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक झाली असून वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अंधेरीत राहणाऱ्या गौरव चौधरी विदेशात नोकरीच्या शोधात असताना त्याला वाशीतील हावरे बिझनेस पार्कमधील प्लेसमेंट कार्यालयाची माहिती मिळाली. त्याठिकाणी त्याने संपर्क साधला असता तिथल्या रोहितकुमार, अजय मनी व रोहन या नावाच्या व्यक्तींनी त्याची फसवणूक केली. या तिघांनी गौरवला दुबईत नोकरी लावून देतो असे सांगून तब्बल १ लाख ७० हजार लंपास केले.या टोळीच्या जाळ्यात अनेक तरुण फसले असल्याची शक्यता आहे.