शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीला मिळाला हिरवा कंदील

By admin | Updated: December 13, 2015 00:21 IST

स्मार्ट सिटी स्पर्धेतील सहभागावरून महापालिकेमधील सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये राजकीय कुरघोडी सुरू झाली आहे. विशेष सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीने फेटाळलेला ठराव

- नामदेव मोरे, नवी मुंबई स्मार्ट सिटी स्पर्धेतील सहभागावरून महापालिकेमधील सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये राजकीय कुरघोडी सुरू झाली आहे. विशेष सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीने फेटाळलेला ठराव मुख्यमंत्र्यांनी कायमस्वरूपी रद्द केला आहे. विरोधकांनी राष्ट्रवादीला धक्का दिला आहे. महापालिकेमध्ये दोन सत्तास्थाने झाली असून, त्यामुळे प्रशासनाची मात्र फरपट सुरू झाली आहे. नवी मुंबई महापालिकेने स्मार्ट सिटी स्पर्धेत सहभागी व्हायचे की नाही, यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आठ दिवसांपासून खडाजंगी सुरू झाली आहे. ४ डिसेंबरपर्यंत राष्ट्रवादीही या प्रस्तावासाठी अनुकूल होती. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी विदेशी कंपनीबरोबर करार केला व गोंधळ सुरू झाला. नवी मुंबई स्मार्ट सिटी स्पर्धेत पहिला क्रमांक मिळविणार, असे आत्मविश्वासाने सांगणाऱ्या राष्ट्रवादीने एसपीव्ही प्रणालीस विरोध करून प्रस्तावच फेटाळला. वास्तविक सत्ताधाऱ्यांनी स्मार्ट सिटीला नाही, तर त्यामधील एसपीव्हीच्या कमिटीवर आक्षेप घेतले होते. परंतु विरोधकांनी आक्रमक भूमिका घेऊन राष्ट्रवादीच्या विरोधात रान उठविले. नागरिकांनीही सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. शिवसेना व भाजपाने आंदोलन करून व नवी मुंबई बंदचा इशारा दिल्यामुळे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन एसपीव्ही प्रणालीमुळे लोकशाहीवर घाला पडणार आहे. हुकूमशाही प्रवृत्ती वाढण्याची शक्यता असल्यामुळे आम्ही हा प्रस्ताव फेटाळल्याचे सांगितले. भाजपा आमदार मंदा म्हात्रे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राष्ट्रवादीने फेटाळलेल्या प्रस्तावाची माहिती दिली. आयुक्त दिनेश वाघमारे यांनीही राज्याच्या मुख्य सचिवांना स्मार्ट सिटी प्रकल्पाविषयीचे सादरीकरण दाखविले. यामुळे मुख्यमंत्र्यांनी सर्वसाधारण सभेमध्ये घेतलेला निर्णय कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.