कोपर खैरणे येथे इमारतीचा स्लॅब कोसळला, चौघेजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 16:44 IST2020-12-01T16:42:46+5:302020-12-01T16:44:13+5:30
Injured : जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोपर खैरणे येथे इमारतीचा स्लॅब कोसळला, चौघेजण जखमी
ठळक मुद्देतिसऱ्या आणि दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पहिल्या मजल्यावर कोसळला आहे.
नवी मुंबई - कोपर खैरणे येथे जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळून चौघेजण जखमी झाले आहेत. सेक्टर १९ येथील सिल्वर सॅण्ड इमारतीमधील ही घटना आहे. तिसऱ्या आणि दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पहिल्या मजल्यावर कोसळला आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक आणि पोलिसांचे पथक दाखल झाले आहे.
कोपर खैरणे येथे जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळून चौघे जखमी. सेक्टर 19 येथील सिल्वर सॅण्ड इमारतीमधील घटना. तिसऱ्या व दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पहिल्या मजल्यावर कोसळला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
— Lokmat (@MiLOKMAT) December 1, 2020