शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
5
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
6
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
7
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
8
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
9
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
10
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
11
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
12
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
13
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
14
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
15
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
16
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कळंबोली वाहतूक पोलिसांचे श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 03:09 IST

कळंबोली सर्कलला सर्व रस्ते एकत्रित येत असल्याने जंक्शनचे स्वरूप प्राप्त झाले आहे. येथे वाहनांची वर्दळ असल्याने मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सार्वजनिक

लोकमत न्यूज नेटवर्ककळंबोली : कळंबोली सर्कलला सर्व रस्ते एकत्रित येत असल्याने जंक्शनचे स्वरूप प्राप्त झाले आहे. येथे वाहनांची वर्दळ असल्याने मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ, सिडको आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वारंवार पत्रव्यवहार करून उपाययोजना करण्यात आल्या नाही. म्हणून सोमवारी सायंकाळी पोलिसांनी श्रमदान करून खड्डे बुजवले.कळंबोली सर्कलला जोडणाऱ्या वेगवेगळ्या रस्त्याची मालकी सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ, सिडको आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आहे. त्यांच्यात समन्वय नसल्याने रस्त्याच्या दुरु स्तीस विलंब होत आहे. पोलीस उपायुक्त नितीन पवार यांच्याकडून संबंधित विभागांना पत्र देण्यात आले, परंतु त्यांची उदासीनता कायम असल्याचे दिसून आले. शेवटी कळंबोली वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी गोरख पाटील यांनी वाहतूक कर्मचाऱ्यांना बरोबर घेतले. त्यांनी खडी आणि डेब्रिज मागितले. त्यांच्या मदतीने ाोमवारी सायंकाळी रस्त्यावरील खड्डे खडीने बुजविले. वाशी ते कळंबोलीपर्यंतच्या सर्व वाहतूक शाखेने संबंधित यंत्रणांकडे खड्डे बुजविण्याकरिता पत्रप्रपंच केला, परंतु त्यांच्याकडून फारशा प्रतिसाद मिळाला नाही. कळंबोली जंक्शनवर खूपच खड्डे पडल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता. म्हणून आम्ही हातात फावडे, घमेले घेवून येथील खड्डे बुजवले. यामुळे काही प्रमाणात वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली.- गोरख पाटील, प्रभारी अधिकारी, कळंबोली वाहतूक शाखा