शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षारक्षक मंडळावर सेनेची धडक

By admin | Updated: December 22, 2015 00:48 IST

सुरक्षारक्षक मंडळामध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून मराठी तरुणांची फसवणूक केल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला आहे.

नवी मुंबई : सुरक्षारक्षक मंडळामध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून मराठी तरुणांची फसवणूक केल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला आहे. या तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेने सानपाडामधील मंडळाच्या कार्यालयावर धडक दिली. या प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करा व फसवणूक झालेल्या तरुणांना कामावर घेण्याची मागणी केली आहे. सुरक्षारक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणेमध्ये भरती करून देण्याचे आमिष दाखवून एम. जी. मिश्रा याने मराठी तरुणांकडून लाखो रुपये घेतले आहेत. सुरक्षारक्षक मंडळाची बोगस कागदपत्रे, खोटे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, नियुक्तीपत्र देवून सुरक्षारक्षकांची नोकरी मिळवून दिली होती. हा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर खळबळ उडाली आहे. या तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना नगरसेवक सोमनाथ वास्कर यांनी फसवणूक झालेल्या युवकांना घेवून सानपाडामधील मंडळाच्या मुख्यालयावर मोर्चा काढला. मंडळाचे सचिव रवीकुमार पाटणकर यांची भेट घेवून तरुणांना फसविणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. नोकरीसाठी पैसे घेतलेला एजंट एम. जी. मिश्रा हा स्वत: बोर्डात सुरक्षारक्षक म्हणून काम करत आहे. याप्रकरणी मंडळाने संबंधित एजंट व त्याला मदत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. याप्रकरणी मोठे रॅकेट सक्रिय असल्याची शंकाही व्यक्त होत आहे. आधी २५ मुलांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले होते. आता ही संख्या ३७ वर गेली आहे.याप्रकरणी तत्काळ योग्य पावले उचलली नाहीत तर शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी मिलिंद सूर्याराव, प्रकाश पाटील, घनश्याम पाटे, प्रकाश चिकणे, विसाजी लोके, संदेश चव्हाण, सुनील गव्हाणे, आशिष वास्कर आदी उपस्थित होते.