शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
3
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
4
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
5
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
6
गुरुवारी ‘हे’ स्तोत्र म्हणा, गुरुबळ मिळवा; धनवृद्धी, सुख-समृद्धी योग शक्य, होईल गुरुकृपा!
7
एक राजयोग, चौपट लाभ: ६ राशींची इच्छापूर्ती, सरकारी कामात यश; व्यापारात नफा, प्रमोशन शक्य!
8
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
9
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
10
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
11
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
12
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
13
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
14
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
15
कार्तिक आर्यनसोबत हेमांगी कवी शेअर करणार स्क्रीन; 'चंदू चॅम्पियन'मध्ये साकारतेय महत्त्वाची भूमिका
16
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
17
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
18
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
19
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
20
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?

जागा वाटपाचे घोडे अडले

By admin | Published: April 05, 2015 1:08 AM

महायुतीच्या पक्षश्रेष्ठींनी युतीचे संकेत दिल्यानंतर शिवसेना - भाजपाच्या स्थानिक नेत्यांत गुरुवारपासून बोलणी सुरू झाली असून आतापर्यंत चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत.

नवी मुंबई : महायुतीच्या पक्षश्रेष्ठींनी युतीचे संकेत दिल्यानंतर शिवसेना - भाजपाच्या स्थानिक नेत्यांत गुरुवारपासून बोलणी सुरू झाली असून आतापर्यंत चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत. गुरुवारच्या चर्चेत ६५ जागांची मागणी करणाऱ्या भाजपाने नमते घेऊन शुक्रवारी रात्री झालेल्या चर्चेप्रसंगी ५० जागांची गळ शिवसेनेस घातली. मात्र, भाजपाने तब्बल १५ जागांची माघार घेऊनही शिवसेना आपल्या काही नेत्यांच्या हट्टासाठी ठरावीक जागा सोडायला तयार नसल्याने युतीत तणाव निर्माण झाला आहे. तर शनिवारी रात्री पुन्हा चर्चेची फेरी होणार असून त्यात एकमत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार आम्ही चर्चेला खेळीमेळीच्या वातावरण सुरुवात केली आहे. गुरुवारी दिलेला ६५ जागांचा प्रस्ताव मागे घेऊन नव्याने ५० जागांचा प्रस्ताव दिला. मात्र, तरीही शिवसेना त्यास मानायला तयार नाही. परंतु, मी अन् माझे कुटुंब हे त्या पक्षातील काही नेत्यांचे धोरण युतीच्या चर्चेला मारक असल्याचे भाजपा नेत्यांचे म्हणणे आहे. शुक्रवारची चर्चा रात्री उशिरा अडीच वाजेपर्यंत चालली. परंतु, प्रत्येक बाबतीत भाजपाने का म्हणून माघार घ्यावी. उलट नवी मुंबईत भाजपाचा एक आमदार आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेपेक्षा आम्ही जास्त प्रभागात आघाडीवर होतो. याची जाणीव त्या पक्षाने लक्षात घ्यायला हवी, असा भाजपाचा दावा आहे.या संदर्भात युतीच्या नेत्यांशी संपर्क साधला असता, महापालिकेत सत्ता आणण्यासाठी शिवसेना - भाजपाने दोघांनी एकेक पाऊल मागे यायला हवे. मात्र, आम्ही एक नव्हे तर दोन-तीन पावले घेतली आहेत. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता हैं, हे शिवसेनेने लक्षात घ्यायला हवे,असे भाजपा आमदार मंदा म्हात्रे लोकमतशी बोलताना म्हणाल्या. मात्र, युती होणारच, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. तर शिवसेना नेते विजय नाहटा आणि विठ्ठल मोरे यांच्याशी संपर्क साधला परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही.(खास प्रतिनिधी)च्शिवसेना आपल्या काही नेत्यांच्या हट्टासाठी वाशी सेक्टर - ९ मधील एका जागेसह ऐरोली आणि नेरूळमधील काही जागा सोडण्यास तयास नसल्याचे सूत्रांनी सांगितले. च्भाजपाला ऐरोलीपेक्षा बेलापूर मतदार संघात जास्त जागा हव्या आहेत. यात सुरुवातीला पक्षाने बेलापुरातून ३५ तर ऐरोलीतून ३० जागांची मागणी केली होती. ती कमी करून ते ५० जागांवर आले आहेत.