शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

परवाना वाटप सुरू झाल्याची अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2015 00:36 IST

रिक्षा परवान्यांचे आॅनलाइन वाटप सुरू झाले असल्याची अफवा शहरात पसरविली जात आहे. यामुळे रिक्षाचालकांमध्ये संभ्रम निमाण झाला असून, वारंवार आरटीओ कार्यालयात विचारणा केली

नवी मुंबई : रिक्षा परवान्यांचे आॅनलाइन वाटप सुरू झाले असल्याची अफवा शहरात पसरविली जात आहे. यामुळे रिक्षाचालकांमध्ये संभ्रम निमाण झाला असून, वारंवार आरटीओ कार्यालयात विचारणा केली जात आहे. परंतु या अफवा असून अद्याप शासनाने परवाना वाटप सुरू केले नसल्याचे संबंधित विभागाने स्पष्ट केले आहे. शासनाने रिक्षा परवान्यांची लॉटरी काढली आहे. परवान्यांसाठी अर्ज मागविण्यात आले असल्याची अफवा काही समाजकंटकांनी शहरात पसरविली आहे. सद्य:स्थितीमध्ये हजारो चालकांकडे परवाना नसल्याने अनेकांनी आरटीओ कार्यालयात जाऊन व फोन करूनही विचारणा सुरू केली आहे. शहरभर याचीच चर्चा सुरू असल्यामुळे चालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे उपप्रादेशिक अधिकारी संजय धायगुडे यांनी सर्वांना आवाहन केले आहे, की शासनाने अद्याप याविषयी कोणत्याही सूचना जारी केलेल्या नाहीत. परंतु त्यानंतरही नागरिकांकडून याविषयी विचारणा होऊ लागली आहे. आॅनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झालेली नाही. शासनाने अद्याप याविषयी कोणताही निर्णय घेतलेला नाही. फक्त टेस्ट साइट चालू करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात अर्ज घेणे सुरू झालेले नाही. शहरवासीयांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. रिक्षा परमिटचे वितरण कधी होणार, हे शासनाकडून जाहीर केले जाईल. याविषयी वर्तमानपत्रांमध्ये रीतसर जाहिरात दिली जाते. अर्ज देण्यासाठी, घेण्यासाठी व इतर सर्व प्रक्रियेची माहिती दिली जाते. यामुळे सद्य:स्थितीमध्ये कोणीही तोंडी चुकीची माहिती दिली तर त्यावर विश्वास ठेवू नये, असेही सांगितले आहे. (प्रतिनिधी)