अवैध वाहतुकीकडे आरटीओची डोळेझाक; वाहनांमधून क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 12:01 AM2019-12-12T00:01:19+5:302019-12-12T00:02:12+5:30

कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

The RTO seems to be neglecting to take action on illegal traffic | अवैध वाहतुकीकडे आरटीओची डोळेझाक; वाहनांमधून क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक

अवैध वाहतुकीकडे आरटीओची डोळेझाक; वाहनांमधून क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक

googlenewsNext

नवी मुंबई : शहरातून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अवैध वाहतुकीवर कारवाईकडे आरटीओचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने यासंदर्भात सातत्याने तक्रार करूनही त्यांनाही प्रतिसाद मिळत नाहीये. परिणामी, खासगी वाहनांमधून होणारी प्रवासी वाहतूक व मालवाहतूक वाहनांमधून क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक अपघातांना निमंत्रण देणारी ठरत आहे.

ठाणे व मुंबईला पुण्याशी जोडणारे दोन महत्त्वाचे मार्ग नवी मुंबईतून गेले आहेत. त्यावरून दिवसरात्र जड-अवजड वाहनांची रहदारी सुरू असते. त्याशिवाय खासगी वाहनेही मोठ्या संख्येने धावत असतात; परंतु या दोन्ही मार्गावरून मोठ्या प्रमाणात होणारी अवैध वाहतूक भविष्यात मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकते, तर यापूर्वी तसे अपघात घडलेही आहेत. त्यामुळे अवैध वाहतुकीला आळा घालावा, अशी सर्वसामान्यांची मागणी असतानाही आरटीओचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होताना दिसत आहे.

खासगी वाहनांमधून होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीचा मोठा फटका एनएमएमटीला बसत आहे. त्यामुळे अनेक मार्गांवर तोट्यामध्ये बस चालवाव्या लागत आहेत. हा तोटा टाळण्यासाठी तसेच संभाव्य दुर्घटनेला आळा घालण्यासाठी अवैध प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाईची मागणी एनएमएमटी प्रशासनाकडून सातत्याने आरटीओकडे करण्यात आलेली आहे; परंतु मोजक्या वाहनांवर दिखाऊ कारवाईव्यतिरिक्त आरटीओचे अधिकारी आपल्या कामाचा ठसा उमटवू शकलेले नाहीत. त्यांच्याकडून खासगी ट्रॅव्हल्ससह मालवाहतूक करणाºया डम्पर व ट्रकलाही कारवाईतून मुभा मिळत असल्याचेही दिसून येत आहे. ट्रॅ

व्हल्सचालकांनी ठाणे-बेलापूर मार्गासह सायन-पनवेल मार्गावर जागोजागी अवैध थांबे करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी रस्त्यावरच बस उभ्या करून प्रवासी भरले जात असल्याने वाहतूककोंडीची समस्या भेडसावत आहे. तर मुंबईतून उलवे परिसरात डेब्रिज व मातीची वाहतूक करणाºया डम्परकडूनही नियमांची पायमल्ली होत आहे. माती अथवा खडी वाहतूक करताना ती बंदिस्त करून नेली जाणे आवश्यक आहे. त्यानंतरही उघड्यावर होणाºया मातीच्या वाहतुकीमुळे हवेत धूलिकण पसरून दुचाकीस्वारांच्या अपघातांना निमंत्रण मिळत आहे. त्यापैकी बहुतांश डम्परमधून क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक होताना दिसत आहे.

Web Title: The RTO seems to be neglecting to take action on illegal traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.