पे अ‍ॅण्ड पार्कमध्ये वाहनचालकांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 12:37 AM2020-01-10T00:37:58+5:302020-01-10T00:38:03+5:30

शहरात नागरिकांना वाहने पार्किंगची सुविधा उपलब्ध होण्यासाठी वर्दळीच्या भागात पे अ‍ॅण्ड पार्क सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे;

Robbery robbery at Pay & Park | पे अ‍ॅण्ड पार्कमध्ये वाहनचालकांची लूट

पे अ‍ॅण्ड पार्कमध्ये वाहनचालकांची लूट

googlenewsNext

नवी मुंबई : शहरात नागरिकांना वाहने पार्किंगची सुविधा उपलब्ध होण्यासाठी वर्दळीच्या भागात पे अ‍ॅण्ड पार्क सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे; परंतु संबंधित ठेकेदारांकडून ठरवून देण्यात आलेल्या दरांपेक्षा जास्त आकारणी करून वाहनचालकांची लूट केली जात आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
नवी मुंबई शहराची निर्मिती करताना सिडकोने विविध सुविधांसाठी भूखंड आरक्षित ठेवले आहेत; परंतु शहरात वाढलेली वर्दळ आणि रहदारी यामुळे वाहने पार्किंगचे भूखंड अपुरे पडू लागले आहेत. रेल्वे स्थानक भागात वाहनतळासाठी आरक्षित ठेवण्यात आलेली जागाही वाहने पार्किंगसाठी अपुरी पडू लागली असून, शहरातील रेल्वे स्थानके
आणि इतर वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेने विविध रस्त्यांच्या कडेला पे अ‍ॅण्ड
पार्कची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सदर पे अ‍ॅण्ड पार्क कंत्राटदारामार्फत चालविण्यात येतात. या ठिकाणी वाहने
पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागू नये, यासाठी महापालिकेने अल्पदरात सुविधा उपलब्ध करून दिली
आहे.
अर्ध्या तासासाठी दुचाकी वाहनांसाठी एक रु पया, तीनचाकी वाहनांसाठी दोन रु पये, चारचाकी वाहनांसाठी पाच रु पये तसेच हलकी वाणिज्य वाहनांसाठी दहा रु पये शुल्क आकारण्यास महापालिकेने मंजुरी दिली आहे. याबाबतचे फलकही या ठिकाणी बसविण्यात आले असून, वाहनचालकांना देण्यात येणाºया पावत्यांवरही सदर दर छापण्यात आले आहेत.
वाहन पार्किंग करून पावती घेतल्यावर गडबडीत जाणाºया वाहनचालकांची मात्र फसवणूक केली जात आहे. पे अ‍ॅण्ड पार्कमध्ये वसुली करणाºया कंत्राटदारांच्या कामगारांकडून दुचाकी वाहनांसाठी सरसकट दहा रु पये आणि तीन आणि चारचाकी वाहनांसाठी २० रुपये शुल्क आकारले जात आहेत. नागरिकांची होणारी आर्थिक लूट थांबण्यासाठी महापालिका प्रशासनाने लक्ष द्यावे आणि संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Web Title: Robbery robbery at Pay & Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.