शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज

By admin | Updated: September 17, 2015 00:14 IST

गुरुवारी आगमन होणाऱ्या गणरायाच्या स्वागतासाठी पोलीस व पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. गणेशोत्सव काळात शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता शहरात पोलिसांचा

- सूर्यकांत वाघमारे/वैभव गायकर,  नवी मुंबईगुरुवारी आगमन होणाऱ्या गणरायाच्या स्वागतासाठी पोलीस व पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. गणेशोत्सव काळात शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. पोलीस आयुक्तालय क्षेत्रात सुमारे ६८ हजार घरगुती तर दीड हजार सार्वजनिक गणेशमूर्तींची स्थापना होणार आहे.गतवर्षी गणरायाला निरोप दिल्यानंतर पुढच्या वर्षीच्या आगमनाची गणेशभक्तांना लागलेली प्रतीक्षा संपलेली आहे. शहरात उत्सवाला कसलेही गालबोट लागू नये याकरिता पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. याकरिता पुढील दहा दिवस शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. स्थानिक पोलीस ठाणेनिहाय हा बंदोबस्त लावला जाणार असून रात्रीच्या गस्तीवर देखील विशेष भर दिला जाणार आहे. त्याशिवाय सार्वजनिक मंडळे व सोसायटी यांना देखील दक्षतेच्या सूचना पोलिसांतर्फे देण्यात आलेल्या आहेत. पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांच्या सूचनेनुसार परिमंडळ १ चे उपआयुक्त शहाजी उमाप व परिमंडळ २ चे उपआयुक्त विश्वास पांढरे यांनी मंडळांच्या बैठका घेतलेल्या आहेत. या बैठकीत केलेल्या सूचनेनुसार परिमंडळ १ मधील ७२ तर परिमंडळ २ मधील २५ सार्वजनिक मंडळे रस्त्याऐवजी मैदानात गणेशोत्सव साजरा करत आहेत. त्यामुळे गणेशोत्सव काळात वाहतुकीच्या मार्गात बदल करुन प्रसंगी उद्भवणारी वाहतूक कोंडीची समस्या सुटलेली आहे.मंडळांनी मंडपात व मंडपाबाहेर सुरक्षेची खबरदारी घेवून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या देखील सूचना पोलिसांनी केलेल्या आहेत. त्याशिवाय अनावश्यक गर्दी टाळून गैरप्रवृत्तीच्या व्यक्तींवर नजर ठेवण्यासाठी स्वयंसेवक नेमण्याचेही सांगितले आहे. तर आवश्यक ठिकाणी साध्या गणवेशातील पोलीस कार्यरत राहणार आहेत. गतवर्षीनुसार यंदाही पोलीस आयुक्तालय क्षेत्रात घरगुती व सार्वजनिक अशा एकूण ६९ हजार गणेशमूर्तींची स्थापना होणार आहे. गतवर्षी परिमंडळ १ मध्ये ३१ हजार ६५५ घरगुती व १०६४ सार्वजनिक तर परिमंडळ २ मध्ये ३५ हजार ८०० घरगुती व ३५० सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव साजरा झाला होता.आगमनानंतर दीड दिवसापासून गणरायाच्या विसर्जनाला सुरवात होते. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच महापालिका, नगरपरिषद देखील सज्ज झाले आहे. परिमंडळ १ मध्ये २३ तर परिमंडळ २ मध्ये ३० ठिकाणी विसर्जनाची सोय केली जाणार आहे. मूर्तीच्या विसर्जनासाठी तराफे, जलतरणपटू त्यासह प्रथमोपचाराचीही सोय केली जाणार आहे.