शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

स्फोटात पावसाचा अडथळा

By admin | Updated: July 16, 2017 02:51 IST

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्गात प्रमुख अडथळा ठरणाऱ्या उलवा टेकडीच्या खोदकामाच्या स्फोटात पुन्हा पावसाचा अडथळा निर्माण झाला आहे.

- लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्गात प्रमुख अडथळा ठरणाऱ्या उलवा टेकडीच्या खोदकामाच्या स्फोटात पुन्हा पावसाचा अडथळा निर्माण झाला आहे. चार दिवसांपासून लागून राहिलेल्या संततधारा पावसामुळे सुरुंग पेरण्याचे काम बंद करावे लागले आहे. दारूगोळा पेरण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांत पाणी साचल्याने तुर्तास हे काम थांबविण्यात आल्याचे सिडकोच्या संबंधित विभागाकडून सांगण्यात आले. सिडकोने विमानतळपूर्व कामे हाती घेतली आहेत. यात उलवे टेकडीची उंची कमी करणे, गाढी नदीचा प्रवाह बदलणे, उच्चदाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करणे आदी प्रमुख कामांचा सामावेश आहे. तब्बल दोन हजार कोटी रुपयांची कामे सुरू करण्यात आली आहेत. यात उलवे टेकडीच्या सपाटीकरणाचे काम अत्यंत जोखमीचे व तितकेच महत्त्वाचे आहे. या टेकडीची उंची ९५ मीटर इतकी आहे. विमानतळासाठी ती ८६ मीटर इतकी कमी केली जाणार आहे. त्यासाठी स्फोटकांचा वापर केला जात आहे. झारखंड येथील सीआयएमएफआर या तज्ज्ञ संस्थेच्या देखरेखीखाली टेकडीच्या उत्खननाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार प्राथमिक स्तरावर टेकडीवर सुरुंग पेरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात टेकडीवर स्फोट घडवून या कामाची चाचणी घेण्यात आली होती. दरम्यान, प्रायोगिक तत्त्वावर आतापर्यंत सुमारे ३५ स्फोट घडविण्यात आले आहेत; परंतु गेल्या चार-पाच दिवसांपासून अविरत कोसळणाऱ्या पावसामुळे कामात व्यत्यय आला आहे. मात्र, पावसाची उघडीप होताच हे काम पुन्हा सुरू करण्यात येईल, अशी माहिती सिडकोचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन निनावे यांनी दिली.