शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मशालींच्या प्रकाशात उजळला ‘किल्ले रायगड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2015 00:02 IST

दिवाळीत प्रत्येकजण आपले घर दिवे आणि रोषणाईने उजळविण्याचा प्रयत्न करतो. मात्र ज्यांच्यामुळे हा सण आज साजरा होत आहे त्या छत्रपत्री शिवाजी महाराजांचा ‘रायगड किल्ला’ मात्र ऐन दिवाळीतही अंधारात असतो.

रोहित नाईक,  रायगड दिवाळीत प्रत्येकजण आपले घर दिवे आणि रोषणाईने उजळविण्याचा प्रयत्न करतो. मात्र ज्यांच्यामुळे हा सण आज साजरा होत आहे त्या छत्रपत्री शिवाजी महाराजांचा ‘रायगड किल्ला’ मात्र ऐन दिवाळीतही अंधारात असतो. यासाठीच ‘पहिली पणती महाराजांच्या चरणी आणि त्यानंतर स्वत:च्या घरी’ असे म्हणत तमाम शिवभक्तांनी किल्ले रायगडावर शेकडो पणत्या आणि तब्बल ३४३ मशाली प्रज्वलीत करुन महाराजांना मानवंदना दिली.श्री शिवराजाभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगडच्या वतीने दरवर्षी ‘शिवचैतन्य’ अंतर्गत वसुबारसच्या दिवशी रायगडावर दिवाळी पहाट साजरी केली जाते. यावर्षी या सोहळ्याचे चौथे वर्ष होते. सुमारे ३०० हून अधिक शिवभक्तांनी या सोहळ्याची सुरुवात शिरकाई देवीच्या पुजनाने केली. येथूनच सर्वांनी ‘एक व्यक्ती एक मशाल’ याप्रमाणे मशाली प्रज्वलित करुन मशालींच्या उजेडात आणि ढोलाताशांच्या गजरात महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. होळीच्या माळावर शिवरायांना मानवंदना दिल्यानंतर याठिकाणी ‘आम्ही मावळे’ ढोलपथकाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. मध्यरात्री ठिक १२ वाजता राजदरबारात पालखी आणल्यानंतर अवघा दरबार मशालींच्या उजेडात प्रकाशमय झाला. येथे महाराजांचे पूजन झाल्यानंतर शिवशाहीरांनी रात्र जागवल्याने उपस्थितांनी पुन्हा एकदा किल्ले रायगडावर ‘शिवशाही’चा अनुभव घेतला. दुसऱ्या दिवशी जगदिश्वराच्या मंदिरात पुजा केल्यानंतर समितीच्या वतीने गडावरील घराघरात दिवाळीचा फराळ वाटून या सोहळ्याची उत्साहात सांगता केली.