बालकर्करोगाविषयी नवी मुंबई महानगर पालिकेची जनजागृती

By नामदेव मोरे | Published: September 6, 2023 04:44 PM2023-09-06T16:44:09+5:302023-09-06T16:44:38+5:30

लहान मुलांमधील कॅन्सर हा योग्य वेळेत उपचार केल्यास पूर्णतः बरा होऊ शकतो.

Public awareness of Navi Mumbai Municipal Corporation about childhood cancer | बालकर्करोगाविषयी नवी मुंबई महानगर पालिकेची जनजागृती

बालकर्करोगाविषयी नवी मुंबई महानगर पालिकेची जनजागृती

googlenewsNext

नवी मुंबई: ‘सप्टेंबर‘  महिना ‘बाल कर्करोग जागरूकता महिना‘ म्हणून संपूर्ण जगभरात साजरा करण्यात येतो. नवी मुंबई महानगरपालिकेनेही याविषयी जनजागृती सुरू केली असून अभियानाचा भाग म्हणून मुख्यालयावर विद्युत रोषणाई करण्यात आली.

लहान मुलांमधील कॅन्सर हा योग्य वेळेत उपचार केल्यास पूर्णतः बरा होऊ शकतो. हा संदेश जास्तीत जास्त प्रमाणात सर्वदूर पोहचण्यासाठी बाल कर्करोग जागरूकता महिना साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने जगभरात ज्या लक्षवेधी वास्तू आहेत त्यांच्यावर सोनेरी रंगाची विद्युत रोषणाई करण्यात येते. या  माध्यमातून बाल कर्करोगग्रस्त मुलांकरिता व त्यांच्या कुटुंबाकरिता #GoGold असा संदेश देऊन त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचा तसेच समाजात बाल कर्करोगाविषयी जागरूकता पसरवण्यात येते.

या  अनुषंगाने महापालिका आयुक्त  राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली  महानगरपालिकेच्या आयकॉनिक  मुख्यालय वास्तूस  सोनेरी रंगाची विद्युत रोषणाई करून बाल कर्करोगाविषयी जनजागृती करण्यात आली.

Web Title: Public awareness of Navi Mumbai Municipal Corporation about childhood cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.